ठाणे

कोट्यवधी रुपये खर्च करून तंत्र विद्यालय पडले धूळ खात. बदलापूर गावातील सरकारी रुग्णालयात प्रसूती गृह कितेक वर्षा पासून बंद.

कोट्यवधी रुपये खर्च करून तंत्र विद्यालय पडले धूळ खात. बदलापूर गावातील सरकारी रुग्णालयात प्रसूती गृह कितेक वर्षा पासून बंद.

 

बदलापूर (किरण नांगरे)- बदलापुर गावात गेल्या दोन वर्षापासून जिल्हा परीषदेने १.५० कोटी (दीड कोटी) खर्च करुन बांधून पुर्ण केली असून, PHC चे उद्घाटन अजून झालेले नाही व ते तसेच धूळ खात पडलेले आहे.PHC मधे पाण्याची व्यवस्था नसल्यामुले तेथे होना-या प्रसूती बंद करण्यात आलेल्या आहेत.असे ग्रामीण रुग्णालया चे आरोग्य आधिकारी  डॉ. तानाजी चव्हाण यांनी सांगितले. ग्रामीण भागातून रोज अनेक आदिवासी व गरीब नागरिक येथे उपचारासाठी  येतात त्याना खाजगी दवाखाने परवडत नाहीत. सरकारी PHC मधे काहीच सोयी नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होते . नाइलाजाने त्याना खाजगी रुग्णालयात जावे लागते.

तसेच बदलापुर गावात शासकीय तंत्र विद्यालय ही गेली दोन वर्षापासून बांधून पुर्ण झाले आहे. त्या इमारतीला शासणाने  ४,३६,७८,३३४/- रु खर्च केले आहेत.तंत्र विद्यालय सुरु नसल्यामुले बदलापुर हायस्कूल मधे भाड्याने वर्ग घेतला आहे. तंत्र विद्यालय महिन्याचे २४०००/- भाड़े भरत आहे .

तंत्र विद्यालयाची ईमारत बांधून तयार असून सुद्धा उद्घाटन न केल्याने बदलापुर हायस्कूलला तंत्र विद्यालय दोन वर्षांत ५३६०००/- नाहक भाड़े भरले आहे.यांची जबाबदारी कोण घेणार असे प्रश्न उभे राहत आहे.

ईमारतींचे उद्घाटन व्हावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री कालिदास देशमुख यांच्या हस्ते दिनांक  ३०/११/२०१७ रोजी सकाळी १०.३० वा प्रतिकारात्मक उद्घाटन झाले.

तरी PHC मधे सर्व सुविधा व त्वरीत पाण्याची व्यवस्था करावी आशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस ने केली आहे.

Google Ad

Related Articles

Back to top button
Close
Close