कोल्हापूर

गगनबावडा तालुक्यातील वेतवडे बंधारा निकामी होण्याच्या मार्गावर.. बंधारा दुरुस्तीची मागणी

गगनबावडा तालुक्यातील वेतवडे बंधारा निकामी होण्याच्या मार्गावर.. बंधारा दुरुस्तीची मागणी

साळवण/प्रतिनिधी
गगनबावडा तालुकयातील वेतवडे -टेकवाडी बंधाऱ्याची झालेली दुरावस्था त्यामूळे पाणी गळती होवून पाणी अडविणेच्या प्रक्रियेत निर्माण झालेला अडथळा तसेच पावसाळ्यात पुरामूळे बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूची जमीन खचून बंधाऱ्या लगत वेतवडे -बालेवाडी रस्त्यात मोठा खड्डा पडल्यामूळे या मार्गावरून वाहतूक धोकादायक झाल्यामूळे गगनबावडा पंचायत समिती उपसभापती पांडुरंग भोसले व सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव खाडे यांच्या पुढाकारातून मागील आठवडयात बंधारा दुरावस्था पाहणी कार्यक्रमाचे आयोजन करुन बंधारा दुरुस्तीच्या मागणीचे निवेदन पाटबंधारे विभागाला देण्यात आले.
यावेळी पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता अभय हेर्लेकर यानी दोन दिवसात काम चालु करण्याचे आश्वासन दिले होते,त्याप्रमाणे पाटबंधारे विभागाने बंधाऱ्या लगत दोन्ही बाजूला जमीन खचलल्याने रस्त्यात पडलेले मोठे धोकादायक खडडे मुजवून बंधाऱ्यावर ४० मीटर लांबीचा काँक्रीट रस्ता करण्यात आला. त्यामूळे बंधाऱ्यावर मोठ मोठे खड्डे पडून निर्माण झालेला धोका टळला असून वाहनधारक व गावकऱ्यांच्या मधून समाधान व्यकत केले जात आहे.

वेतवडे – टेकवाडी बंधारा दुरुस्तीसाठी
उपसभापती पांडुरंग भोसले, सर्जेराव खाडे, माजी सभापती एकनाथ शिंदे, वेतवडेचे सरपंच साताप्पा कांबळे आदीसह उपसरंपच मानकू शिंदे,पोलिस पाटील कोंडीराम शिंदे, पिंटू कांबळे, अनिल शिंदे , दगडू धनवडे,शरद गुंजवटे, दिलीप गुंजवटे, भाऊसाहेब शिंदे, जयवंत कांबळे यानी विशेष प्रयत्न केले.

फोटो कॅप्शन
१ ) वेतवडे – टेकवाडीचा दुरावस्थ बंधारा दुरुस्तीचे निवेदन पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता अभय हेर्लेकर यांना देताना उपसभापती पांडुरंग भोसले, सर्जेराव खाडे,माजी सभापती एकनाथ शिंदे, सरपंच साताप्पा कांबळे व अन्य
२) वेतवडे -टेकवाडी बंधाऱ्यावरील खड्डे मुजवून नव्याने करण्यात आलेला काँक्रीट रस्ता

Google Ad

Related Articles

Back to top button
Close
Close