शैक्षणिक

गडहिंग्लजमध्ये जागतिक एड्स दिनानिमित्त मानवी मनोरा…

गडहिंग्लजमध्ये जागतिक एड्स दिनानिमित्त मानवी मनोरा…

गडहिंग्लज (प्रतिनधी) : साई इंटरनॅशनल स्कूलच्यावतीने काल (दि.१) रोजी जागतिक एड्स दिन साजरा करण्यात आला. आजही समाजात ‘एड्स’ म्हटले की त्याचा संबंध नितीमत्तेशी, आचरणाशी लावला जातो. परंतु एड्सची अनेक विविध लक्षणे आहेत. याची माहिती देणेसाठी साईच इंटरनॅशनल स्कूलच्यावतीने विद्यार्थ्यांनी ‘एड्स जनजागृती’ कार्यक्रम घेण्यात आला. त्यांनी एका छोटया नाटिकाद्वारे या रोगाची लक्षणे व्याप्ती तसेच घ्यावयाची काळजी याविषयी जनजागृती केली. यावेळी सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी मानवी साखळीद्वारे एड्स बाधितांना संबोधन केले. यावेळी प्राचार्य सुहास जाधव, मोहसीन चाँद, शिक्षकांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. या उपक्रमास साई शिक्षण समूहाचे अध्यक्ष सतीश पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब घुगरे यांनी सहकार्य केलं . 

Google Ad

Related Articles

Back to top button
Close
Close