कोल्हापूर

गारगोटी ग्रामपंचायतीच्या वतीने कुपोषण बालकांसाठी कार्यशाळा

गारगोटी ग्रामपंचायतीच्या वतीने कुपोषण बालकांसाठी कार्यशाळा

गारगोटी / किशोर आबिटकर
भुदरगड तालुक्यातील गारगोटी शहरामध्ये कुपोषित बालकांचे प्रमाण जास्त आहे. त्यासाठी गारगोटी शहरामध्ये कुपोषण मुक्त गारगोटी कार्यक्रम राबविला पाहिजे. कुपेाषित बालकांसाठी सकस आहार, पालकांची मानसिकता व योग्य अशी जनजागृती करणे गरजेचे आहे. कुपोषित बालकांसाठी दुध, अंडी, चक्की अशा प्रकारचा सकस आहार देणे गरजेचे आहे. गारगोटी शहरातील ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य सेवक, मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेवीका व पालक यांच्या समन्वयाने एक समिती स्थापन करून गारगोटी शहर कुपोषण मुक्त करणेत यावे असे आवाहन प्रा.अर्जुन आबिटकर यांनी गारगोटी ग्रामपंचायतीच्या वतीने कुपोषित बालकांसाठी आयोजित केलेल्या एक दिवसीय कार्यशाळेमध्ये व्यक्त केले.
यावेळी डॉ.भगवान डवरी, महिला बाल कल्याण सुपरवायझर सौ.भोसले यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमास सरपंच सौ.सरिता चिले, उपसरपंच अरुण शिंदे, ग्रामपंचायत सदस्य महेश सुतार, सतिश कांबळे, तुकाराम गुरव, सौ.छाया सारंग, गिता मोरे, रुपाली राऊत यांच्यासह पालक, लहान मुले, अंगणवाडी सेविका आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी जालेंद्र बुवा यांनी केले तर आभार ग्रा.पं.सदस्य अल्ताफ बागवान यांनी मानले.

फोटो
कार्यक्रमास उपस्थित प्रा.अर्जुन आबिटकर, सदस्य महेश सुतार, डॉ.डवरी, सौ.भोसले आदी.

Google Ad

Related Articles

Back to top button
Close
Close