कोल्हापूर

गारगोटी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

गारगोटी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

गारगोटी प्रतिनिधी : भिमा – कोरेगावमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या गारगोटी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आज गारगोटीचा आठवडा बाजार असूनही शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेऊन बंदला पाठिंबा दिला. शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
तालुक्यातील सर्व आंबेडकरी पक्ष, संघटनेने बंदचे आवाहन केले होते. सकाळी कार्यकर्त्यांनी शहरातून मोटारसायकल रॅली काढली. त्यानंतर क्रांती ज्योतीसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जेष्ठ नेते दलितमित्र पी.एस.कांबळे, व्ही.जे.कदम, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष डॉ.राजीव चव्हाण, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष डॉ.जयश्री चव्हाण, आर.एस.कांबळे, युवराज पाटील, मिलिंद पांगिरेकर, दिनकर कांबळे, दयानंद म्हेत्तर, राजेंद्र चिले, व्यापारी संघाचे अध्यक्ष विश्वनाथ घाटगे,आल्ताफ बागवान, श्रीकांत कांबळे, निता विजय आदित्य, बंटी यादव, विजय आदित्य, प्रकाश वास्कर, पंचायत समिती सुनिल निंबाळकर यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी बहुजन रयत परिषदेचे अध्यक्ष भगवान थडके, उपसरपंच अरुण शिंदे, एस.के.कांबळे, नामदेवराव कांबळे, एस.डी.कांबळे, कृष्णा कांबळे, अनिल जाधव, मिलिंद प्रधान, बबन कांबळे, साताप्पा कांबळे, पी.एन.कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Google Ad

Related Articles

Back to top button
Close
Close