ताज्या घडामोडी

जलवाहतूक प्रकल्पाला वेग,तीन आठवड्यात होणार करार , पालिका आयुक्तानी केले योजनेचे सादरीकरण 

जलवाहतूक प्रकल्पाला वेग,तीन आठवड्यात होणार करार ,
पालिका आयुक्तानी केले योजनेचे सादरीकरण 

 

ठाणे , ( शरद घुडे ) :
ठाण्यातील अंतर्गत जलवाहतूक प्रकल्पाला केंद्रीय जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हिरवा कंदील दाखविला असून पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गडकरी यांच्या दालनात प्रकल्पाचे सादरीकरण केले. गडकरी यांनी तीन आठवड्यात करार करण्याचे निर्देश दिले.

ठाणे-वसई-कल्याण, ठाणे ते मुंबई आणि ठाणे ते नवी मुंबई या मार्गावर जलवाहतूक सेवा सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. यासंर्दभातील तपशीलवार प्रकल्प अहवाल तज्ज्ञ सल्लागार मे. मेडुला साॅप्ट टेक्नाॅलाॅजीज या कंपनीच्या माध्यमातून करण्यात आला आहे. यासंदर्भातील सादरीकरण महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज वाहतूक भवनात केंद्रीय जलवाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांच्यासमोर सादर केले. यावेळी या प्रकल्पाच्या प्रगतीविषयी समाधान व्यक्त करून ना. गडकरी यांनी ठाणे महानगरपालिकेने तीन आठवड्यात केंद्र सरकारच्या अंतर्गत जलवाहतूक प्रकल्प विभागाशी सामंजस्य करार करावा जेणेकरून सदर प्रकल्पासाठी लागणा-या निधीचे वितरण करणे सुलभ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.  त्याचबरोबर या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी ना. गडकरी यांनी आयआयटी, चेन्नई, जेएनपीटी, बीपीटी आणि कोचीन शीपयार्ड या संस्थांशीही समन्वय साधण्याच्या सूचना देतानाच या प्रकल्पातंर्गत जागतिक दर्जाच्या सुविधा आणि तंत्रज्ञान पुरविण्याबाबत त्यांनी महापालिकेस आश्वासित केले.  प्रकल्पातंर्गत चालविण्यात येणा-या बोटी या सीएनजी आणि मिथेनाॅलवर चालणा-या असल्याने ही वाहतूक प्रदूषणविरहित असणार आहे.

Show More
Back to top button
Close
Close