मुंबई उपनगर

झोपु प्राधिकरण मे.जयेश रियलटर्स आणि मे.परिणी बिल्डर्स यांचा आर्थिक घोटाळा व बोगस पुराव्यातून गैर व्यवहार झाल्याचे उघड

झोपु प्राधिकरण मे.जयेश रियलटर्स आणि मे.परिणी बिल्डर्स यांचा आर्थिक घोटाळा व बोगस पुराव्यातून गैर व्यवहार झाल्याचे उघड

१) मे.जयेश रियलटर्स यांनी झोपडीधारकांना विकासक म्हणून दिलेले आश्वासन पूर्तता हवेतच

२)१५० झोपडीधारकांची अपात्रता/अनिर्णयीत पाठपुरावा कायम न केल्याने बेघर होण्याची शक्यता.

३)मे जयेश रियलटर्स आणि पार्टनर मे.परिणी डेव्हलपर्स यांच्या खाजगी कराराला (अग्रीमेंट )झो.पु.प्रा.विभागातील विधी विभागाचीच बेकायदेशीर मान्यता देऊन मे. परिणी डेव्हलपर्स यांना पुनर्वसनाची मान्यता देऊन झोपडीधारकांची फसवणूक

४)भाडे देण्याच्या नावाखाली मे.परिणी डेव्हलपर्स आणि कार्यकारिणी यांचा सहकार विभागातील अधिकारी यांच्या गैरहजेरीतच खोटा व दिशाभूल करणारा जीबीआर ठराव मंजूर

५) मी. रियलटर्स प्रथम विकासक आणि झोपडीधारक यांची संमती नसतानाही सहनिबंधक सहकार विभागाची मे. परिणी डेव्हलपर्स विकासकाच्या खोट्या जीबीआर ठरावाला मंजुरी.

६) चारकोप पोलीस ठाणे यांना गैर व्यवहार झाल्याची लेखी तक्रार व न्याय मिळण्यासाठी आंदोलन करून देखील न्याय मिळालाच नाही.फसवणूक झाल्याचे उघड होऊनही भ्रष्ट विकासकांनाच पाठिंबा असल्याने नागरिक त्रस्त,दिनांक – ०९/११/२०१७ रोजी आर्थिक गुन्हे विभागाकडून कायदेशीर कार्यवाहीस पात्र प्राप्त झाले असतानाही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे.

 

मालाड , ( निसार अली ) : मुंबईतील झोपु प्रकल्प मध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे होत आहेत हे  प्रकार मुंबई कांदिवली पश्चिम भाब्रेकर नगर येथील साईकृपा एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था,सहयोग सहकारी गृहनिर्माण संस्था,जनसेवा सहकारी गृहनिर्माण संस्था येथे सध्या झोपु योजने अंतर्गत मे.परिणी विकासक प्रकल्प राबवीत आहेत.माहिती अधिकारी कार्यकर्ता व प्रतिनिधी  रवींद्र चिपळूणकर व संस्थेतील झोपडीधारक रहिवाशी .रामदास बालू कांबळे यांनी येथील प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे झोपु प्राधिकरणाच्या निदर्शनास आणले शिवाय त्यासंबंधित पुरावे देऊन कारवाई करण्यासाठी अनेक तक्रारी दिल्या असता विकासकावर काहीच कारवाई होताना दिसत नसल्याने  स्थानिक झोपडी धारकांनी रविवारी दिनांक १८ फेब्रुवारी विकासकाच्या विरोधात धरणे केले आणि मे  जयेश रिएल्टर्स आणि मे.परिणी डेव्हलपर्स यांचा निषेध केला. विकासक बदली करण्याबाबत झो.पु.प्रा.नियमाची तरतूद किंवा कागदपत्र पूर्ण असल्याशिवाय सहनिबंधक विभाग आणि अभियांत्रिकी विभाग यांच्या दिशाभूल अहवालावर मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.दीपक कपूर यांनीच झोपडीधारकांची तक्रारीची दखल न घेता मे. परिणी डेव्हलपर्स यांना ५% रक्कम भरण्याची परवानगी देऊन अनधिकृत विकासकाम अधिकृत केले.यातूनच कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचे उघड झाले असल्याने श्री.रवींद्र चिपळूणकर व झोपडीधारक रामदास बालू कांबळे यांनी सांगितले.मे. जयेश रियलटर्स विकासकाने झोपडीधारकांना संक्रमण शिबीर किंवा भाड्याची तरतूद पूर्तता न दिल्याने झोपडीधारकांना मागील आठ ते दहा महिने वंचित राहावे लागेल याचा गैर फायदा घेत मे.परिणी डेव्हलपर्स विकासक यांनी २०१५ वर्षी झोपडीधारकांची स्वाक्षरी घेऊन जीबीआर लेखी ठराव तयार केला आणि या दिशाभूल ठरावाला सहनिबंधक सहकार विभाग यांनी दिनांक -२४/११/२०१७ रोजी मंजुरी दिली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मे. परिणी डेव्हलपर्स यांना ५% रक्कम भरण्याची परवानगी देऊन पुनर्वसनात अधिकृत मंजुरी देऊन मे.परिणी डेव्हलपर्स यांच्या नावे एलओआय निर्णयाला मंजुरी दिली.विकासकाने यामध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार करून स्थानिकांची दिशाभूल करून विकासक बदली केला आहे,त्यामुळे स्थानिकांनी याच ठिकाणी आंदोलनही केले होते परंतु झो.पु.प्रा. मुख्य कार्यकारी अधिकारी  दीपक कपूर यांनी विकासकाला पाठबळ देत स्थानिकांच्या मागण्या व तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने रविवार दिनांक – १८ रोजी स्थानिक झोपडीधारकांनी ऐन उन्हात इमारतीच्या प्रवेश द्वाराजवळ बसूनच धरणे करून घोटाळेबाज विकासकाचा निषेध केला. यावेळी चारकोप पोलीस ठाण्यातील अधिकारी येऊन धरणे करीत असलेल्या लोकांना धरणे करू नका असे सांगण्यात आले,परंतु रवींद्र चिपळूणकर यांनी यासाठी पाठपुरावा करून जर घोटाळेबाज विकासकावर कारवाई नाही झाली तर आंदोलन छेडण्यात येईल असे पत्रच पोलीस ठाण्यालाही दिले असल्याचे निदर्शनास आणून दिले त्यानंतर मात्र पोलिसही  उभे होते. परंतु विकासकावर कोणत्याही प्रकाराची कारवाई करण्यास पोलिसांनी पुढाकार घेतला नसल्याने गरीब झोपडीधारकांमध्ये नाराजीचे वातावरण होते.या पुढे मंत्रालयात जाऊन आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

Google Ad
Back to top button
Close
Close