मी-आम्ही

ठाण्यात  तीन दिवसाचे व्हेज आणि नॉनव्हेज बिर्याणी महोस्त्व ! 

ठाण्यात  तीन दिवसाचे व्हेज आणि नॉनव्हेज बिर्याणी महोस्त्व ! 

 

ठाणे , ( शरद घुडे ) : 
ठाण्यातील विविध क्षेत्रातील नामवंत कलाकारांच्या संस्थेच्या वस्तीने बिर्याणी फेस्टिवलचे आयोजन ठाण्यात शुक्रवारपासून करण्यात आले आहे . २३ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी या काळात  सांयकाळी ५ ते ११ वाजेपर्यंत जांभळीनाका येथील शिवाजी मैदानात बिर्याणी फेस्टिवल सुरु राहणार आहे .  

ठाणेकर खवय्यांना आस्वाद घेण्यासाठी दिल्ली बिर्याणी , हैदराबादी बिर्याणी , अवधी  बिर्याणी  , अशा प्रसिद्ध ब्रान्डच्या १५ पेक्षा  विविध प्रकारच्या बिर्याणी   या फेस्टिवलमध्ये उपलब्ध असणार आहेत.या  फेस्टिवलमध्ये  २० हून अधिक  स्टोल लावण्यात येणार  आहेत. या फेस्टिवलमध्ये ३० रुपये  नाममात्र प्रवेश फी असणार आहे, मनोरंजनाच्या कार्यक्रमासोबत  शाही तुकडा , फिरणे हे मुघलांचे शाही स्वीटची चवही घेता येणार आहे.  त्यासोबत लाईव्ह  आईस्क्रीम  कमी किमतीत उपलब्ध असणार आहे . बिर्याणी सोबत विविध स्टार्टस , कबाबचे अनेक प्रकाराचा अस्वाद घेता येणार आहे.   बिर्याणी  महोस्त्वात  १५० ते ३००  या किमतीत  बिर्याणी  मिळणार आहे. याचा  ठाणेकरांनी  लाभ  घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. या फेस्टीवलचे  उदघाटन कलाकार उदय सबनीस , रवी जाधव आदीच्या उपस्थित होणार असल्याचे  स्वराज्य इंव्हेंटचे अध्यक्ष , हर्षद समर्थ यांनी  सांगितले .

Google Ad
Back to top button
Close
Close