क्राइम

ठाण्यात दुर्मिळ खवले मांजर हस्तगत – दोघे तस्कर गजाआड  

ठाण्यात दुर्मिळ खवले मांजर हस्तगत – दोघे तस्कर गजाआड  

 

ठाणे , ( श्याम जांबोलीकर ) :
अतिशय दुर्मिळ असलेले खवले मांजर विक्री करण्यासाठी आलेल्या दोघा तस्करांना ठाणे गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने अटक केली आहे.अशोक जाधव (29) रा.रायगड आणि संतोष बुटाला रा.पोलादपूर अशी अटक आरोपींची नावे असून या तस्कराकडून जिवंत खवले मांजर आणि बोलेरो जीप असा 45 लाख १ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.या खवले मांजराची किंमत 40 लाख असून खवले मांजराला वनविभागाच्या हवाली करण्यात आले.याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात वन्यजीव अधिनियम 1972 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशी माहिती पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी दिली.

ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील श्रीनगर,अय्यप्पा मंदिर येथे दोघे व्यक्ती तोंडात एकही दात नसलेला व मुंग्या आणि त्यांच्या अळया खाऊन जगणारा दुर्मिळ सस्तन प्राणी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती वागळे गुन्हे शाखेला मिळाली होती.त्यानुसार,सापळा रचून बोलेरो गाडीतून आलेल्या रायगड येथील जाधव आणि बुटाला या दोघा तस्करांना खवले मांजरासह अटक करण्यात आली.चौकशीत हे खवले मांजर चाळीस लाख रुपयात विकण्यासाठी आणले असल्याचे उघडकीस आले.कँसरसारख्या आजारावर औषध बनवण्यासाठी या सस्तन प्राण्याच्या खवल्यांचा  वापर केला जातो.मात्र,या तस्करांनी कुणासाठी या वन्यप्राण्याची तस्करी केली.याचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.

Google Ad

Related Articles

Back to top button
Close
Close