ताज्या घडामोडी

ठाण्यात राज्य परिवहन कर्मचारी संघटनांचे ढोल वाजवीत आंदोलन 

ठाण्यात राज्य परिवहन कर्मचारी संघटनांचे ढोल वाजवीत आंदोलन 

 

ठाणे , ( श्याम जांबोलीकर ) :
प्रलंबित रखडलेला करार करावा, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर करावा. एसटी महाबीमंडळाचे खाजगीकरण करू नये अशा विविध मागण्यासाठी शुक्रवारी दुपारी कास्ट्राइब राज्य परिवहन कर्मचारी संघटनाद्वारे “ढोल बजाओ, शासन जागाओ” नारा देत ढोल  वाजवीत ठाणे वंदना एसटी डेपो या विभागीय कार्यालयासमोर अभिनव आंदोलन आणि निदर्शने केली . 

राज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या अनेक वर्षांपासून शासनाकडे प्रलंबित आहेत. या मागण्या मंजूर करण्यासाठी शासन दरबारी चालढकल सुरु होती. दरम्यान झोपलेल्या सरकारला आणि शासनाला जाग यावी यासाठी शुक्रवारी वंदना सिनेमा जवळील ठाणे एसटी विभागीय कार्यालय समोर कर्मचारी यांनी गळ्यात ढोल आणि ताशा वाजवीत “ढोल बजाओ, शासन जागाओ” असे अभिनव आंदोलन केले. विविध मागण्याचे आणि नार्याचे फलक गळ्यात कर्मचारी यांनी लटकविले होते. आमच्या मागण्या शासन दरबारी पोचाव्या म्हणून हे आंदोलन आणि निदर्शने करण्यात आल्याचे कर्मचारी यांनी सांगितले.

Show More
Back to top button
Close
Close