डोंबिवली मधील व्यापाऱ्यांनी घेतली केडीएमसी आयुक्तांची भेट

डोंबिवली मधील व्यापाऱ्यांनी घेतली केडीएमसी आयुक्तांची भेट
लवकरच व्यापऱ्यांसाठी सकारात्मक विचार केला जाईल आयुक्तांची व्यापाऱ्यांना ग्वाही !
डोंबिवली ( प्रथमेश वाघमारे ) : राज्यातील वाढती कोरोना ग्रस्थांची संख्या लक्षात घेता शासनाने कडक नियमावली तयार केली आहे. सोशल डिस्टसंसच्या नियमांचे पालन केले जात नसल्यांने शासनाने दुकाने बंद करण्याच्या सूचना केल्या आहेत.
मात्र पाच महिने झाले दुकान बंद असल्याने आमची देखील अर्थिक घडी बिघडली असून आम्हाला तातडीने दुकान सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी व्यापाऱ्यांच्या शिष्ट मंडळाने शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तांकडे केली आहे.
सर्व नियमांचे पालन करण्यास तयार असून आम्हाला आता नियमावलीमधून वगळण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.त्यामुळे आता व्यापाऱ्यांच्या हाकेला आयुक्त धावून येतात का हे पाहन महत्त्वाचे ठरणार आहे.