कोल्हापूर

तब्बल ४० वर्षानंतर सुरु होतेय ” सेकंड इनिंग ” गारगोटीतील माजी विद्यार्थ्यांचा उपक्रम

तब्बल ४० वर्षानंतर सुरु होतेय ” सेकंड इनिंग ”
गारगोटीतील माजी विद्यार्थ्यांचा उपक्रम

 

गारगोटी / किशोर आबिटकर
चार दशकाच्या प्रदीर्घ कालखंडानंतर शाळकरी मित्रांनी एकत्र जमून आयुष्यात ” सेकंड इनिंग ” संकल्पना आखली असून वयाच्या १५ -१६ व्या वर्षी थांबवलेल्या मैत्री सामन्याची दुसरी इनिंग पुन्हा पुर्वीच्याच जोशात सुरवात करण्याचा निर्णय गारगोटी येथील शाहू कुमार भवन प्रशालेत झालेल् माजी विद्यार्थी बैठकीत घेण्यात आला.
गारगोटी येथील श्री मौनी विद्यापीठाच्या शाहू कुमार भवन या प्रशालेत इ. स. १९७६-७७ या वर्षात इयत्ता दहावी मध्ये शिकत असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा, आयोजित करावा, ४० वर्षापूर्वीचे ‘त्या’ काळातील स्नेहबंध जपावेत, आपल्या बाल मैत्रीचा विस्तार करावा आणि त्यानंतर सामाजिक उपक्रम हाती घ्यावेत असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. हा स्नेहमेळावा रविवार दि. २५ फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी १० ते ४ या वेळेत मौनी विद्यापीठाच्या श्री शाहू कुमार भवन आणि सी.टी. सी. मध्ये होत असून अधिकाधिक माजी विद्यार्थ्यां पर्यंत पोहचण्याचे काम सुरू झाले आहे. या बॕचच्या विद्यार्थ्यांनी उपस्थिती साठी सर्जेराव मुगडे( ८२०८७४९६५४ ) आणि किशोर आबिटकर (९१७५५९५५४७) यांच्याशी संपर्क साधावा.
प्रारंभी स्वागत दीपक भोसले यांनी केले. प्रास्तविक सर्जेराव मुगडे यांनी केले. किशोर आबिटकर यांनी नियोजनाची कल्पना मांडली. हेमंत गोंगाणे, शेखर हवालदार, रमेश मगदूम, सुनिल शहा, चंद्रकांत कोडकणी, सुनिल ढणाल, सुरेश आकोळकर, दिलीप देसाई, प्रकाश खांडके, इश्वरा भोपळे, अमर इंदूलकर, रवी देसाई यानी मनोगत व्यक्त केले. यावेळी अर्जून सावंत, तानाजी देसाई, अल्हाद शेट्टी, शिवाजी झोरे, विकास बोरवडेकर, नामदेव शिंदे, बाळासो सुतार, आदी उपस्थित होते.

Google Ad

Related Articles

Back to top button
Close
Close