वर्धा

तरूण पर्यावरण प्रेमींमुळे शहराला नवसंजीवनी मिळाली. – वनश्री श्री. दिगांबर खांडरे.

तरूण पर्यावरण प्रेमींमुळे शहराला नवसंजीवनी मिळाली. – वनश्री श्री. दिगांबर खांडरे

पर्यावरण संवर्धन संस्थेचा ६ वा वर्धापन दिन वृक्षारोपनाने साजरा.

 

हिंगणघाट ( प्रभाकर कोळसे ) : पर्यावरण संवर्धन संस्थेच्या ६ व्या वर्धापन दिनानिमीत्त पिंपळगाव (मा.) येथे वृक्षारोपणाचा व शाखचे ऊद्घाटन असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन वनश्री पुरस्कृत श्री. दिगांबरजी खांडरे यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करून करण्यात आले.

वृक्ष हा श्वास आहे
म्हणून हा ध्यास आहे
नाही तर पृथ्वीचा -हास आहे.

हा वसा घेत कडूनिंब, कदंब, जारूळ, चाफा, सप्तपर्णीची झाडं ट्री-गार्डसह श्री. नितीनजी सिंगरू, रूग्नमित्र श्री. गजूभाऊ कुबडे, श्री. अजयजी वानखेडे, नगर सेवक मनिष देवढे, सुनिल डोंगरे या मान्यवरांच्या ऊपस्थितीत लावण्यात आले. या वेळी गावातील तरूण मंडळ आणि हिंगणघाट शहरातील वृक्षप्रेमी मंडळी उपस्थित होती. संचालन प्रमोद माथनकर तर आभार कान्हा कलोडे यांनी मानले. कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीताने झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे सचिव प्रदीप गिरडे, कोषाध्यक्ष गौरव जामूनकर, सचिन थुल, हेमंत हिवरकर, मनोज चिताडे, हेमंत महाजन, पिंपळगाव येथील गावकऱ्यांनी मेहनत घेतली.

 

पर्यावरण संवर्धन संस्था, हिंगणघाट पिंपळगाव येथे शाखेची स्थापना.

हिंगणघाट शहरात वृक्ष लागवड व संवर्धन. तसेच जल संधारण, स्वच्छता अभियानाला चांगला प्रतिसाद बघता पर्यावरण संवर्धन संस्थेची पिंपळगावला शाखा सुरू व्हावी अशी तेथील तरूण मंडळी आणि गावकऱ्यांची इच्छा होती. याच पार्श्वभूमीवर पिंपळगाव येथे संस्थेच्या शाखेची स्थापना करण्यात आली.

 

शाखेची कार्यकारीणी

प्रमोद माथनकर (अध्यक्ष), नितीन पिटेकर (उपाध्यक्ष), निलेश बलखंडे (सचिव), रोहन बनसोड (सहसचिव), कान्हा कलोडे (कोषाध्यक्ष), चक्रधर माथनकर, अमोल घ्यारे, मंगेश माथनकर, किशन माथनकर, वैभव मोरे, प्रशांत माथनकर, संकेत नक्षीने, प्रतिक झाडे यांची सदस्य या पदावर नियुक्ती करण्यात आली.

नवनियुक्त कार्यकारणीला कार्यक्रमाचे उद्घाटक श्री. दिगांबरजी खांडरे, नितिन सिंगरू, गजूभाऊ कुबडे, अजय वानखेडे, मनिष देवढे, सुनिल डोंगरे यांनी शुभेच्छा दिल्या व संस्थेने आजवर केलेल्या कार्यावर समाधान व्यक्त केले. शाखेच्या आर्थिक बळकटीसाठी दिगांबरजी खांडरे, नितीन क्षीरसागर, चंद्रकांत ननंदकर आणि मंगेश माथनकर यांच्याकडून प्रत्येकी ११०० रूपयांची मदत देण्यात आली. शाखेच्या कार्यकारणीचे वाचन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आशीष भोयर यांनी केले.

Google Ad
Tags
Back to top button
Close
Close