मनोरंजन

दता मोरसे यांच्या गव्यांच्या जीवनावरील झुंड कांदबरीचे प्रकाशन .

दता मोरसे यांच्या गव्यांच्या जीवनावरील झुंड कांदबरीचे प्रकाशन .

 

शैलेंद्र उळेगड्डी/कडगाव
प्रसिद्ध जंगल अभ्यासक व निसर्ग संशोधक दता मोरसे यांच्या ‘ झुंड’ या रानगव्यांच्या जीवनावर आधारित कादंबरीचे प्रकाशन मठगांव येथे भरलेल्या निसर्गानंद, साहित्य संम्मेलनात झाले .हे प्रकाशन मौनी महाराज मठ पाटगांव मठाचे मठाधिपती श्रीमंत संजीव बेनाडीकर (सरकार) व प्रसिद्ध लेखक गावठाणकार क्रुष्णात खोत यांच्या हस्ते पार पडले.
मानवी जीवनाच्या भावभावनांचा जंगली रानजीवांशी कसा संबध येतो ,या आशयाचा धागा घेऊन जंगलातील गव्यांच्या कळपातील बारकावे, जंगलाची भाषा, मानवी जगण्याचा जंगलावर होणारा परिणाम, इतर प्राण्यांची, पाखरांची बोली ,अरण्यातील जगण्याच्या पध्दती अशा विविध शैलीने ही कादंबरी वाचकांच्या भेटीला येत आहे. या कादंबरीचा परिचय मुर्तीकार एम डी रावण यांनी करुन दिला. दता मोरसे यांनी कादंबरी जंगलात कशी आकार घेत गेली आणि त्यातील काही प्रसंग सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एम के खोत यांनी केले यावेळी बालसाहित्यिक डॉ मा ग गुरव, आयुर्वेदाचार्य नारायण डवर ,उद्योजक प्रविण दाभोळे, गीतकार बाळ पोतदार, जयवंतराव हावळ ,वाय के पाटील, डॉ एस बी शिंदे , बी वाय पाटील, डॉ दता कदम,डॉ शोभा घाटगे,डॉ श्रीकांत पाटील, डॉ संभाजी सुर्यवंशी ,मधु भोसले, बाळ भोसले,एस के पाटील,सुभाष माने, हजर होते आभार सी व्ही देसाई यांनी मानले.

दता मोरसे यांच्या झुंड कादंबरीचे प्रकाशन करताना डावीकडून बाळ पोतदार ,एम डी रावण, मठाधिपती संजीव बेनाडीकर ,गावठाणकार क्रुष्णात खोत. डॉ मा ग गुरव, जयवंतराव हावळ, प्रवीण दाभोळे, आणि दता मोरसे.

Show More

Related Articles

Back to top button
Close
Close