मनोरंजन

दिक्षा गुरव हिचे रविवारी कोल्हापूर आकाशवाणीवर काव्यवाचन

दिक्षा गुरव हिचे रविवारी कोल्हापूर आकाशवाणीवर काव्यवाचन

गारगोटी / प्रतिनिधी : गंगापूर (ता. भुदरगड) येथील कु. दिक्षा दत्तात्रय गुरव हिचे रविवारी कोल्हापूर आकाशवाणीवरून काव्यवाचन प्रसारित होणार आहे. सायंकाळी ७.३० वा. युवावाणी या लोकप्रिय कार्यक्रमातून हे काव्यवाचन प्रसारण होईल. नुकतेच या कार्यक्रमाचे ध्वनीमुद्रण झाले असून तिला कोल्हापूर आकाशवाणीवरून ही पहिली-वहिली संधी लाभली आहे.
कु. दिक्षा ही सध्या कृषी महाविद्यालयात बी.एस.सी.(कृषी) मध्ये शिकत असून तिला कथा , कविता लेखनाचा छंद आहे. यापूर्वी तिने राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवला आहे. तिला आई-बाबांसह शिक्षक काका अशोक गुरव व अन्य थोरांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत आहे.

Show More

Related Articles

Back to top button
Close
Close