नाशिक

दिव्यांग हिताय !!! दिव्यांग सुखाय !!!

दिव्यांग हिताय !!! दिव्यांग सुखाय !!!

 

नाशिक ( रमेश पांडे ) :बारशिंगवे ता इगतपुरी जि नाशिक येथे दिव्यांग बांधवांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध होऊन दिव्यांग बांधवांचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी मंजूर करण्यात आलेली लघुउद्योग केंद्र इमारत जवळपास अंतिम टप्प्यात असून दिव्यांग लघुउद्योग केंद्र इमारतीस दिव्यांग बांधवांसोबत गटविकास अधिकारी जाधव साहेब , सहाय्यक गटविकास अधिकारी वेंधे साहेब यांनी भेट दिली . हक्काच्या इमारतीत उद्योग सुरु करण्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण, तसेच कापडी पिशव्या शिवून देणे , कापडी मास्क तयार करणे, शालेय विद्यार्थ्यांना गणवेश शिवून देणे, लाह्या , मुरमुरे बनविणे , बेकरी व इतर उत्पादन प्रशिक्षण कार्यक्रम दिव्यांग लघुउद्योग केंद्रात होतात .

दिव्यांग बचत गटांच्या माध्यमातून दिव्यांग व वंचित दुर्बल घटकांना विकासाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहोत. तसेच घरकुलाच्या लाभार्थींना घरकुल, रेल्वे व बस पास सवलत, देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे गटविकास अधिकारी जाधव साहेब ,सहाय्यक गटविकास अधिकारी वेंधे साहेब यांनी सांगितले .

या कार्यक्रमाप्रसंगी बारशिंगवे ग्रामपंचायत चे सरपंच वसंत बोराडे ,उपसरपंच पोपट लहामगे , ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक केकाने भाऊसाहेब व हरिदास लोहकरे जिल्हा परिषद सदस्य नाशिक यांनी
दिव्यांग बांधवांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी व त्यांचा विकास करण्यासाठी सदैव तत्पर राहनार असे सांगितले .

Tags
Show More

Related Articles

Back to top button
Close
Close