क्राइम

नकली नोटांचा व्यवसाय करणाऱ्या कडियाला अटक 

नकली नोटांचा व्यवसाय करणाऱ्या कडियाला अटक 

 

ठाणे , ( शरद घुडे ) :
बांधकामावर कडिया (गोवंडी) म्हणून काम करणाऱ्या एका कामगाराला ठाणे खंडणी विरोधी पथकाने ठाण्याच्या ज्ञानसाधना कॉलेजच्या आसपास २ लाख ३१ हजार २०० रुपयांच्या नकली नोटांसह अटक केली. त्याच्या विरोधात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास खंडणी विरोधी पथक करीत आहे.

ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने ज्ञानसाधना कॉलेज जवळच्या परिसरात प्रकाश प्रसाद उर्फ शंकर टोकाल(४२) याला नकली २ हजार नोटा हस्तगत केल्या. हस्तगत केलेल्या नोटात पाचशे आणि शंभर रुपयांच्या नोटा हस्तगत केल्या. २ लाख ३१ हजार २०० रुपयांच्या नोटात दोन हजाराच्या ११३ नोटा, पाचशे रुपयांच्या १० नोटा आणि शंभर रुपयांच्या २ नोटा आढळल्या. आरोपी   प्रकाश प्रसाद उर्फ शंकर टोकाल हा कडीयाचे काम करीत होता. तो मुळचा झारखंड येथील हजारीबाग जिल्ह्यामध्ये बारभट्टा गौफहांडे गावाचा निवासी आहे. टोकाल हा भवन निर्माते आणि ठेकेदार यांच्याकडे लादी लावण्याचे काम करीत होता. तो ठाण्यात ज्ञानसाधना कॉलेज जवळच्या विश्वकर्मा चाळ येथे राहत होता. त्याला अटक केल्यानंतर वागले इस्टेट पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अधिक तपास पोलीस पथक करीत आहे. या नोटांच्या रॅकेट मध्ये आणखीन कुणाचा समावेश आहे काय? याचा तपास करीत आहेत.

Google Ad

Related Articles

Back to top button
Close
Close