नाशिक

नाशिक धावणार समाज स्वास्थ अन् युवा क्रयशक्तीसाठी !!!

नाशिक धावणार समाज स्वास्थ अन् युवा क्रयशक्तीसाठी !!!

!!!

 

नाशिक , ( कुमार कडलग ) :
पोलिस आयुक्तालयातर्फे रविवार दि.१८ फेब्रूवारी रोजी नाशिक मॕरेथाॕनचे आयोजन करण्यात आले असून यात तब्बल १२ हजार आबालवृध्द नाशिककर धावणार आहेत.समाजात सलोखा वाढीस लागावा,पोलिस आणि सामान्य जनतेतील दरी कमी व्हावी,त्यातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे समाजातील व्यक्तीगत व संघटीत गुन्हेगारी कमी व्हावी,आॕनलाईनच्या व्यसनात बुडालेल्या तरूणाईला मोकळ्या मैदानाकडे आकर्षीत करून त्यांच्या क्रयशक्तीला नवा जोश उपलब्ध देण्याच्या उद्देशाने ही मॕरेथाॕन आयोजीत केल्याचे पोलिस आयुक्त डाॕ.रविंद्र कुमार सिंगल यांनी सांगीतले.यंदाची पोलिस आयुक्तालयाची ही तिसरी मॕरेथाॕन आहे.lead
रविवारी पहाटे पाच वाजल्यापासून नाशिक महानगराची पाऊले गोल्फ क्लबच्या दिशेने पडू लागतील.निमित्त असेल पोलिस आयुक्त डाॕ.रविंद्र कुमार सिंगल यांच्या कल्पक नियोजनातून साकारलेल्या पोलिस आयुक्तालय मॕरेथाॕन ३ चे.नागरिकांचे मानसिक आणि शारिरिक स्वास्थ अस्वस्थ आहे.त्याची कारणे अनेक आहेत.हे स्वास्थ बिघडल्याने समाजाच्या सांघिक स्वास्थ्यावर त्याचा परिणाम होतो.दुसर्या बाजुला कायदा सुव्यवस्था राबवितांना काही जटील प्रसंगी जनतेचा सहभाग मिळवितांना पोलिस यंञणेला नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो.पोलिस आणि जनता यांच्यातील समन्वयाचा अभाव ,समज गैरसमज या गोष्टींचा पोलीसांच्या कार्यक्षमतेवर कळतनकळत परिणाम होत असतो.तरूण पिढी सध्या आॕनलाईनच्या नेट(जाळे) मध्ये अडकल्याने संकुचीत ,एकल,हेकट आणि आत्मविश्वास गमावून बसल्याने त्यांची क्रयशक्ती क्षीण झाली आहे.या सर्व बाबी प्रत्यक्षअप्रत्यक्ष कायदा सुव्यस्थेला बाधक ठरतात.हे चाणाक्षपणे हेरलेले पो.आयुक्त रविंद्र कुमार सिंगल यंदा समाज स्वास्थ आणि तरूणांची क्रयशक्तीचे संवर्धन अशी मॕरेथाॕन २०१८ चे घोषवाक्य बनवले आहे.
या मॕरेथाॕनसाठी तब्बल बारा हजार नाशिककरांनी सहभाग नोंदविल्याने पहाटे पाच वाजेपासून प्रत्यक्षधावण्यास सुरूवात होऊन दुपारी बारा वाजेपर्यंत निर्धारीत मार्गावर धावण्यासह विविध प्रबोधन कार्यक्रमांचा आस्वाद नाशिककर घेणार आहेत.
मॕरेथाॕनच्या यशस्वीतेसाठी या काळात वाहतूक कोंडी होऊन नाशिककरांना मनस्ताप सोसावा लागू नये म्हणून वाहतूक मार्गातही बदल करण्यात आला आहे.३/५/१०/२१/४२ अशा वेगवेगळ्या टप्यावर ही मॕरेथाॕन पार पडणार असून ३किमीसाठी गोल्फ क्लब,ञ्यंबक नाका सीबीएस अशोक स्तंभ केटीएचएम समोरून टिळकवाडी सिग्नल जलतरण तलावा गोल्फ क्लब,५किमीसाठी गोल्फ क्लब ञ्यंबक नाका सीबीएस सिग्नल अशोक स्तंभ केटीएचएम काॕलेजसमोरील उड्डाण पुला जुना गंगापूर नाका कॕनडा काॕर्नर जुना सीबीटी सिग्नल भवानी सर्कल गोल्फ, १० किमीसाठी गोल्फ क्लब ञ्यंबक नाका सीबीएस सिग्नल अशोक स्तंभ केटीएचएम काॕलेजसमोरील उड्डाणपुल,जुना गंगापूर नाका जेहान सर्कल महात्मानगर एबीबी सर्कल आयटीआय सिग्नल भवानी सर्कल गोल्फ क्लब ,२१ किमीसाठी गोल्फ क्लब ञ्यंबक नाका सीबीएस सिग्नल अशोकस्तंभ केटीएचएम काॕलेजसमोरील उड्डाणपूल जुना गंगापूर नाका जेहान सर्कल महात्मानगर एबीबी सर्कल आयटीआय सिग्नल पिंपळगाव बहुला ञ्यंबक रोडने परत त्याच मार्गाने जुना सीबीटी सिग्नल गोल्फ क्लब ,४२ किमीसाठी गोल्फ क्लब ञ्यंबक नाका सीबीएस सिग्नल अशोक स्तंभ केटीएचएम काॕलेजसमोरील उड्डाण पुल जुना गंगापूर नाका जेहान सर्कल महात्मा नगर एबीबी सर्कल आयटीआय सिग्नल पपया नर्सरी पिंपळगाव बहुला हाॕटेल संस्कृती ञ्यंबक रोडने त्याच मार्गावरून एबीबी सिग्नल हाॕटेल सिबल समोरून जुना सीबीटी सिग्नल गोल्फ क्लब,तर स्पर्धकासांठी गोल्फ क्लब ञ्यंबक नाका सीबीएस सिग्नल अशोक स्तंभ जेहान सर्कल एबीबी सर्कल या मार्गावर डाव्या बाजूने व एबीबी सर्कल पासून हाॕटेल संस्कृती पर्यंत रस्त्याच्या उजव्या बाजूने धावण्याचा मार्ग निश्चित केला आहे.
या मॕरेथाॕनमध्ये प्रत्यक्ष धावणे तसेच धावपटूंना प्रोत्साहीत करण्यासोबत विविध विषयांवर होणार्या माहीतीपर व्याख्यानांसाठी नाशिककरांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित रहावे असे आवाहन पोलिस आयुक्तालयाने केले आहे.पहीली तीन किमी साठीची मॕरेथाॕन पहाटे पाच वाजता सुरू होणार असून त्यानंतर प्रत्येकी पंधरा मिनीटांच्या अंतराने पुढील अंतराच्या मॕरेथाॕन सुरू होतील.

Google Ad

Related Articles

Back to top button
Close
Close