क्रीडा

पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालयात विशेष क्रीडा महोत्सव संपन्न.

पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालयात विशेष क्रीडा महोत्सव संपन्न.

भिवंडी ( वेंकटेश रापेल्ली ) :

भिवंडी पंचक्रोशीतील शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणा-या पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच शेठ जुगीलाल पोद्दार इंग्लिश मेडीयम स्कूल भिवंडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज विशेष क्रीडा महोत्सव  संस्थेच्या उपाध्यक्षा व विद्यालयाच्या माजी प्राचार्या  सौ. अरुणाताई जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

 

आजच्या कार्यक्रमाला वडाळा- मुंबई येथिल शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य  मा.श्री.पारगावकर सर, कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार मा.श्री. निरंजन डावखरे साहेब, समाज कल्याण न्यास भिवंडीचे अध्यक्ष मा.डॉ.समाजसेवक सोन्या काशिनाथ पाटील साहेब, पंचायत समिती भिवंडी सदस्य सौ. ललिता पाटील (राहणाळ), जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीम.अमृतवाड, पंचायत समिती भिवंडीचे विस्तार अधिकारी मा.श्री. संजय अस्वले साहेब, सहाय्यक पोलीस  निरीक्षक .मा.श्री.मुर्तडक साहेब, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय ठाणेचे अध्यक्ष मा.श्री.सचिन मोरे, तसेच श्री.पालव व श्री.जयस्वाल तसेच संस्थेचे सरचिटणीस मा.श्री. पिंजारी सर, खजिनदार मा.श्री.जे.डी.भोईर सर, मा.श्री.श्रीराम भोईर साहेब, प्राचार्य कुलकर्णी सर, प्राचार्य मा.श्री.जी.ओ.माळी सर, पालक प्रतिनिधी श्री.रविंन्द्र शामराव शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाला सुरुवात होणेपूर्वी मान्यवर पाहुण्यांचे लेझीम – ढोल-ताशा यांच्या गजरात वाजत गाजत आगमन झाले. नंतर मान्यवरांच्या हस्ते शिक्षण महर्षी पद्मश्री अण्णासाहेब यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. तद्नंतर विशेष क्रीडा महोत्सवाचे ध्वजारोहण प्रमुख पाहुण्यांचे हस्ते झाले. क्रीडा मशालीचे आगमन झाल्यावर पाहुण्यांनी या मशालीचे स्वागत व पूजन करुन पाहूण्यांनी या प्रसंगी आकाशात फुगे सोडून या विशेष क्रीडा महोत्सवाचे उद्घघाटन झाले असे जाहीर केले. यानंतर माननीय प्राचार्य श्री.जी.ओ. माळी सर यांनी प्रास्ताविक भाषणात संस्थेच्या कार्याचा व विद्यालयाच्या प्रगतीची माहीती मान्यवरांना करुन दिली. प्रमुख अतिथी  श्री. पारगावकर सर यांनी आपल्या मनोगतातून विशेष क्रीडा महोत्सवाचे कौतूक केले. महाराष्ट्र बाणा कायम राखला गेला पाहीजे यासाठी असे उपक्रम महत्वाचे असतात. असे ते म्हणाले. तर अध्यक्षीय मनोगतातून सौ. अरुणाताई जाधव मॅडम यांनी विद्यालयातील उपक्रमाची माहीती दिली. असे अनेक नाविन्यपूर्वक उपक्रम सौ.अरुणाताई जाधव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली अखंडपणे चालू असतात.

या विशेष क्रीडा महोत्सवात मल्लखांब, जिमन्यास्टिक, कराटे, दांडपंट्टा, लाठीकाठी, योगासने, यांचे विशेष प्रात्यक्षिके व संचालन दाखविण्यात आले.

दुपार सत्रात लेझीम संचलन स्पर्धा  आयोजित करण्यात आल्या. यामध्ये भिवंडीतील माध्यमिक शाळा टेमघर, पोद्दार इंग्लिश मिडियम, स्कूल, म.न.पा.शाळा क्र.४५ भिवंडी.बी.एन.एन.महाविद्यालय भिवंडी. दांडेकर विद्यालय, अभिनव बालविद्यामंदिर नवी ताडाळी, इ. शाळांचा सहभाग होता. तर  संचलन स्पर्धेत पी.आर.हायस्कूल भिवंडी बी.एन.एन.कॉलेज भिवंडी हॉलीमेरी इंग्लिश मीडियम स्कूल, पोद्दार हायस्कूल या शाळांनी सहभाग घेतला.

अशा प्रकारचा क्रीडा मोहत्सव भिवंडीत प्रथमतःच आयोजित करण्यात आला होता. या क्रीडा मोहत्सव यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक श्री वैभव गव्हाळे, शिंदे आर.एस. श्री.बिरारी व्ही.एस. यांनी महत्वाचे योगदान व परिश्रम करून अतिशय उत्कृष्ठ पणे यशस्वी केला. विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम बघण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल उपस्थित सर्वांकडून त्यांचे कौतुक करण्यात आले श्री.संतोष शेट्टी यांचेही सहकार्य कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी लाभले. श्री पालव मंगलमूर्ती कलेक्शन भिवंडी लासलगावचे कॉलेजचे प्राध्यापक डॉ.नारायण जाधव, मा.सतीश जाधव, एकलव्य मल्लखांब अकॅडमी ठाणे, वर्षा उपाध्याय वडाळा मुबंई व इतर मान्यवर मोठ्या प्रमाणात विध्यार्थी व क्रीडाप्रेमी नागरिकांची उपस्थिती होती.

Show More

Related Articles

Back to top button
Close
Close