पाटगाव प्रकल्पाच्या मौनीसागर जलाशयात उच्चांकी पाणी साठा

पाटगाव प्रकल्पाच्या मौनीसागर जलाशयात उच्चांकी पाणी साठा
कडगाव / प्रतिनिधी
भुदरगड,कागल व कर्नाटक सीमवासीयांसाठी वरदायिनी ठरत असलेल्या पाटगाव येथील मौनीसागर जलाशय या धरण क्षेत्रात या वर्षी तब्बल ५१०५ मी.मी. पावसाची नोंद झाली आहे.गेल्या पाच वर्षातील उचांकी पावसाची नोंद या वर्षी झाली आहे.
अजूनही आडे,भटवाडी,तळी, मळी येथील छोट्या-मोठ्या ओढ्यातून धरण क्षेत्रात तुरळक प्रमाणत पाण्याचा ओघ चालू आहे.
पाटगाव येथील मौनीसागर जलाशय क्षेत्रात गेल्या पाच वर्षातील उचांकी पाऊसाची नोंद या वर्षी झाली आहे.२०१३साली ६०८७ मी.मी.इतकी पावसाची नोंद झाली होती तद नंतर या वर्षी पर्यंत पाच हजार मिलिमीटर च्या वर पावसाची नोंद झालेली नाही.
सध्या धरणातून वीज प्रकल्प व सांडवा आशा दोन्ही ठिकाणी वरून विसर्ग बंद असून धरणात ५२५.५०मीटर उंच तर १०४.५७० द.ल.घ.मी.(३.२७८ टी.एम.सी)पाणी साठा आहे.अशी माहिती पाऊस मोजमापक अंकुश राऊळ यांनी दिली.
फोटो:-पाटगाव येथील मौनीसागर जलाशय.