क्राइम

बँकेचे एटीएम तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या  २५ वर्षीय तरुणाला १ वर्षाचा कारावास 

बँकेचे एटीएम तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या  २५ वर्षीय तरुणाला १ वर्षाचा कारावास 

 

ठाणे , ( बळीराम सावंत )
बँकेच्या एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न करणाऱ्या २५ वर्षीय कचरावेचक याला  जिल्हा न्यायालयाच्या  प्रथमवर्ग  न्याय दंडाधिकारी जे आर मुलाणी यांनी दोषी ठरवीत आरोपी अब्बास मुख्तार खान याला एक वर्षाची सक्त मजुरीचा कारावास आणि १,५०० रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली.

२५ वर्षीय आरोपी अब्बास मुख्तार  खान (२५) रा. लोणीपाडा, डहाणू पालघर याने १९ ऑगस्ट,२०१७ रोजी बँकेच्या एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला होता.  मात्र एटीएमचा पासवर्ड न मिळाल्याने खान याचा प्रयत्न फसला. पोलिसांनी या प्रकरणी अब्बास खान याला अटक केली. न्यायालयात सरकारी वकील मनीषा परमार यांनी युक्तीवाद करीत तपास  अधिकारी बाळकृष्ण नावकर यांनी सादर केलेले पुरावे ग्राह्य धरीत आरोपी अब्बास खान याला एक वर्षाची सक्तमजुरीची शिक्षक आणि दीड हजाराचा दंड अशी शिक्षा शनिवारी ठोठावली.

Google Ad

Related Articles

Back to top button
Close
Close