क्राइम

बदलापुरात तरुणाची हत्या करून मृतदेह रेल्वे ट्रॅकवर!तरुणाच्या कुटुंबियांचे शेजारील राहणाऱ्या महिलेवर आरोप

बदलापुरात तरुणाची हत्या करून मृतदेह रेल्वे ट्रॅकवर!तरुणाच्या कुटुंबियांचे शेजारील राहणाऱ्या महिलेवर आरोप

बदलापुर(गौतम वाघ): मुंबईत राहणाऱ्या एका तरुणाचा मृतदेह बदलापूरला रेल्वे रुळावर आढळलाय. या तरुणाची हत्या करण्यात आल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केलाय.
राम भोजने असं या २२ वर्षीय तरुणाचं नाव असून तो महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. पूर्वी बदलापूरला राहणारा राम सध्या कुटुंबियांसोबत मुंबईत राहात होता. बदलापुरातल्या शेजारी महिलेला रामने उसने पैसे दिले होते, मात्र अनेकदा तगादा लावूनही ही महिला पैसे परत करत नसल्यानं राम काल संध्याकाळी बदलापूरला पैसे घेण्यासाठी आला होता. मात्र तो घरी परत आलाच नाही. यादरम्यान त्याच्या भावाला रेल्वे पोलिसांनी फोन करून रामचा रेल्वे रुळात मृतदेह आढळल्याची माहिती दिली. ही हत्या पैसे घेतलेल्या शेजारी महिला आणि तिच्या पतीनेच मिळून केली असल्याचा आरोप रामच्या वडिलांनी केलाय. त्यामुळे पोलीस सध्या या दिशेनं तपास करतायत.

Google Ad

Related Articles

Back to top button
Close
Close