क्राइम

बदलापुरात लहानग्याच्या अपहरणाचा प्रयत्न फसला क्लोरोफॉर्म लावल्यानं आरुषचा चेहरा भाजला , बदलापूर पोलिसांनी केली अपहरणकर्त्याला अटक

बदलापुरात लहानग्याच्या अपहरणाचा प्रयत्न फसला क्लोरोफॉर्म लावल्यानं आरुषचा चेहरा भाजला , बदलापूर पोलिसांनी केली अपहरणकर्त्याला अटक

बदलापुर (गौतम वाघ)- कुटुंबाच्या सतर्कतेमुळे बदलापुरात एका ७ वर्षीय मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न फसलाय. आरुष परब असं या मुलाचं नाव आहे, मात्र अपहरणाच्या प्रयत्नात त्याचा चेहरा क्लोरोफॉर्ममुळे भाजलाय.

बदलापूर पूर्व भागातील गोपाळ हाईट इमारतीत आरुष हा त्याच्या परिवारासह राहतो. रविवारी सायंकाळी तो इमारतीखाली खेळत असताना अचानक दिसेनासा झाला. त्यामुळं त्याच्या बहिणीने शोधाशोध केली असता त्यांच्याच इमारतीत राहणाऱ्या सुनील पवार याने त्याला एका रिक्षात तोंड दाबून मांडीत बसवल्याचं आढळलं. त्यामुळं त्याच्या बहिणीनं त्याला लगेच घरी नेलं. आपण सुनीलसोबत खेळत असल्याचं आरुषनं घरच्यांना सांगितलं. तर सुनील ओळखीचाच असल्यानं घरच्यांनाही शंका आली नाही. मात्र काल दुपारी अचानक आरुषचा चेहरा काळा पडायला सुरुवात झाली. त्यामुळे त्याला डॉक्टरांकडे नेलं असता त्याचा चेहरा क्लोरोफॉर्ममुळे भाजल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आणि कुटुंबियांना मोठा धक्का बसला. त्यानंतर काल रात्री उशिरा आरुषच्या वडिलांच्या तक्रारीवरून बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपी सुनील पवारला अटक करण्यात आली. आरुषचे वडील शेखर परब हे बिल्डर असून आरोपी सुनीलचे वडीलही त्यांच्याचकडे काम करतात. त्यामुळं सुनीलने आरुषच्या अपहरणाचा प्रयत्न नेमका का केला? याचा तपास पोलीस करतायत.

Google Ad

Related Articles

Back to top button
Close
Close