शैक्षणिक

बालदिनानिमित्य सोनाळी ( गारगोटी ) विद्या मंदिरात बालसभा

बालदिनानिमित्य सोनाळी ( गारगोटी ) विद्या मंदिरात बालसभा

गारगोटी / प्रतिनिधी : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाला नेहरू यांची १२८ वी जयंती व कायदे विषयक शिबिर, भुदरगड तालुका विधी सेवा समिती व विधीज्ञ मंडळ गारगोटी यांचे विद्यमाने विद्या मंदिर सोनाळी गारगोटी ता . भुदरगड येथे संपन्न झाले. येथे बालसभेचे आयोजन केले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्री.संभाजीराव शिवाजी पारवे यांनी आपल्या मनोगतात प्राथमिक शाळा या बालसंस्कार केंद्रे असून शिक्षक आपल्या अमोघ ज्ञानातून उद्याचा सुजान नागरिक बनवत असतो. जिल्हा परिषदेची विद्या मंदिर सोनाळी शाळा अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमातून बालकांचा सर्वांगीण विकास करतांना दिसत आहे. मी ही असाच जिल्हा परिषद शाळेचा एक विद्यार्थी असलेचा मला सार्थअभिमान वाटतो.
प्रमुख वक्ते जेष्ठ विधीज्ञ पी . पी. चौगले यांनी आपल्या मनोगतातून मुलांच्या बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक विकास होणे गरजेचे असलेने, मोबाईल गेम खेळण्यापेक्षा क्रीडांगणावरील खेळ खेळावेत असा सल्ला दिला. शिक्षकांनीही जाणीवपूर्वक या विषयावर विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे असे सांगितले .
घन:शाम ठाकूर यांनी बालकामगार व त्यातून निर्माण होणा-या समस्या व निराकरण या विषयी मुलांना बालकथेतून बालकथेतून मार्गदर्शन केले. शाळांमधून सुद्धा रॅगिंग कसे होते हे छोट्यां उदाहरणातून दाखवून दिले. छोटे नियम पाळणे म्हणजेच कायदा पाळणे होय, असे ही नमूद केले. याप्रसंगी कुमारी हर्षिता संग्राम निकम इ २री हिच्या ‘ बच्चे मनके सच्चे , सारे जग के आॅख के तारे।’ या सुरेल गीत गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कुमारी हर्षदा पाटील व कुमारी अस्मिता देसाई या विध्यार्थिनीनी बालदिनाविषयी माहिती सांगीतली. या कार्यक्रमास मुख्याध्यापिका सौ. सुनिता पाटील , श्री. मारुती देवेकर , सौ. संजीवनी डवरी , सौ. मनीषा कोदले , शिक्षक वृंद , विद्यार्थी – विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. विनायक चौगले , सूत्रसंचालन श्री. दशरथ कोटकर तर आभार श्री. मारुती पोवार यांनी मानले. दिवाणी न्यायालय गारगोटी यांच्या वतीने मुलांना खाऊवाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.

Google Ad

Related Articles

Back to top button
Close
Close