बुलढाणा

बुलढाणा जिल्ह्यातील सप्तऋषि ची परिक्रमा कोरोनामुळे यावर्षी थांबणार ……

बुलढाणा जिल्ह्यातील सप्तऋषि ची परिक्रमा कोरोनामुळे यावर्षी थांबणार ……

 

बुलढाणा(रविंद्र वाघ) : श्रावण मासातील तिसऱ्या सोमवारी मध्यरात्रीपासून भाविक करतात पन्नास किलोमीटर ची पायी सप्तऋषि वारी . श्रावण मासातील तीसऱ्या सोमवारच्या रात्री विदर्भ सहित संपूर्ण महाराष्ट्रातील देखील भाविक मोठ्या संख्येने बुलढाणा जिल्ह्यातील सप्तऋषी ची वारी करण्यासाठी येत असतात . परंतु यावर्षी कोरोना महामारी मुळे भाविकांची गर्दी पाहायला मिळत नाही . मेहकर तालुक्यातील वडाळी ते ईश्वरी या पन्नास किलोमीटर अंतरामध्ये 7 सप्त ऋषींचे पवित्र स्थान आहे , या सात ऋषी मध्ये वडाळी येथील विशिष्ट ऋषी घोटी येथील बगदा लब्ब , ऋषी वरवंड येथील वाल्मीक ईश्वर ऋषी , पाथर्डीतील पाराशर ऋषी, दुर्ग बोरी येथील दुर्वास ऋषी आणि विश्वी तील विश्वमित्र ऋषी अशी मेहकर तालुक्यामध्ये सप्तऋषी चे स्थान आहेत. याठिकाणी असलेल्या महादेवाच्या पिंडी चे पूजन करण्‍यासाठी शिवभक्त श्रावण मासात प्रत्येक सोमवारी मोठया संख्येने उपस्थीत आसतात .
प्रत्येक ऋषीचे वेगवेगळे महत्त्व आहे परंतु यावर्षी कोरोना महामारी मुळे पारंपारीक वारीला माञ खिळ बसणार आहे .

या सप्तऋषी परिसरातील प्राचीन ऐतिहासिक नगरी असल्याची नोंद ब्रम्हांडपुराण या ग्रंथात आहे तसेच मानव ग्रंथामध्ये सुद्धा या नोंदी आढळतात . दक्षिणेकडे प्रस्थान करताना प्रभू रामचंद्रांचे पदस्पर्श या भागाला झाले आहेत , पांडवाच्या वनवास काळात त्यांचे वास्तव्य दंडकारण्यात होते तेव्हा ऋषी मुनी च्या दर्शनासाठी जात असताना या सप्त ऋषींच्या आश्रमात काही दिवस वास्तव्य होते असे महाभारतात नमूद आहे . श्रावण महिन्यातील चारी सोमवारी सप्तऋषि च्या दर्शनासाठी भावीक मोठ्या संख्येने संख्येने जमत होते , सातही सप्तऋषिचे मंदिरे पक्या दगडांनी बांधलेले आणि घनदाट जंगलामध्ये आहेत . या इतिहास कालीन सातही सप्तऋषि च्या मंदिराचे व रस्त्याचे काम करणे गरजेचे आहे अशी मागणी शिवभक्तां कडून होत आहे.

Tags
Show More
Back to top button
Close
Close