कोल्हापूर

भरमूआण्णा पाटील यांच्या मंत्री पदाच्या कारकिर्दीत मुबलक पाणी साठा

भरमूआण्णा पाटील यांच्या मंत्री पदाच्या कारकिर्दीत मुबलक पाणी साठा

 

दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
युतीच्या काळात थोडे का दिवस राहीना भरमुअण्णा पाटील यांना मत्रींपद मिळाले त्याचाच फायदा चंदगडच्या विकासाला झाला . त्यावेळी तालुक्यात लहाण मोठी बरीच धरणे मजुंर झाली . तालुक्यात पाण्याचा मुबलक साठा झाला . त्यामुळे शेतकरी वर्ग नवनवीन प्रयोग करूण वेगवेगळ्या प्रकारची बारमाही पिके घेऊ लागला .एकंदरीत शेतकरी वर्ग सुधारत आला . पण ह्या पाण्याच्या साठ्यासाठी बांधलेल्या धरणाच्या परिसरातील अवस्था काय ? ह्याकडे कोणाचेच लक्ष्य नाही . धरणाच्या परिसरात रस्सा पाटर्यांना जोर असल्याने या ठिकाणी सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे . तालुक्यातील नेत्यांनी अथवा सेवाभावी सस्थां, तरुण मडंळे यांनी पुढाकार घेऊण याकडे लक्ष्य देणे गरजेचे आहे .
सुट्टीच्या दिवशी किंवा एखाद्या सणासुदिला ग्रुपने फिरायला जाण्याचे फॅड सध्या वाढले आहे . त्यातच चंदगड तालुक्याला निसर्गाची झालर असल्यामुळे पर्यटक इकडे आकर्षीत होतो . तालुक्याबरोबर शेजारील कर्नाटक राज्यातुन देखिल चंदगडचे निसर्ग सौंदर्य पाहण्यास लोक येतात . पण सध्या हे पर्यटक म्हणुन येणारे लोक ह्या चदंगड च्या निसर्गाला मारक ठरत आहेत . कारण तालुक्यासाठी बाधंलेल्या जगमंहट्टी, आबेवाडी, झांबरे अशा अनेक लहाण- मोठया धरणावर पर्यटक वाढलेत खास करूण रविवारी या सर्वच ठिकाणी भरपुर गर्दी असते . त्यामुळे ह्या धरण परीसरात कचऱ्यांचे साम्राज्य वाढले आहे . येणारे पर्यटक नुसतेच फिरायला न येता काही रस्सा पाटर्यांसाठी येतात . त्यामुळे पत्रावळया, मटणातील हाडे, शिल्लक राहीलेले अन्न, इतर घाण तसेच मद्याच्या बाटल्यांचा खच पडल्याचे ह्या ठिकाणी दिसुण येते . काही लोक तरी ही सर्व घाण धरणाच्या पाण्यात फेकताना दिसतात . जगमंहट्टी धरणावर तर सुरक्षतेसाठी कोणच नसल्याणे या ठिकाणाची अवस्था दैयनीय झाली आहे . या ठिकाणी असणाऱ्या कार्यालयीण कामकाजाच्या ईमारतीचीं पडझड झाली आहे . या ईमारतींचा वापर सध्या येथे येणारे तरुण पर्यटक मटणाच्या पाटर्यां करण्यासाठी करत आहेत . धरणाच्या जायच्या वाटेवर बाजुला पत्रावळया व दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसतात . अति हौशी पर्यटक दारू पिऊण धिगांना घालणे अथवा धरणाच्या पाण्यात जाऊण दगांमस्ती करतात . अशामुळे बऱ्याच धरणांच्या ठिकाणी बुरुण मरणाच्या गोष्टी घडल्या आहेत . येथील घाणीचे साम्राज्य वाढु नये त्याचबरोबर भविष्यात वाईट काही घडु नये याकरीता सबंधीत खात्याने अशा ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नेमणुक करूण या गोष्टींना आळा घालावा . अशी मागणी परीसरातील शेतकऱ्याच्याकडून होत आहे .
वास्तवीक पाहता तालुक्यातील काही धरणे ही पर्यटण व्यवसाय व विकासाला चालणा देणारी आहेत . धरणामध्ये बोटिंग किंवा पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या काही योजना राबल्यास तालुक्याचा पर्यटण विकासाला चालणा मिळू शकते .सबंधीत खात्याला जमत नसेल तर खाजगी कंपन्याणा या ठिकाणी व्यवसाईकता करण्यास परवाणगी दिल्यास या ठिकाणी स्वच्छता राहीलच पण तालुक्याच्या पर्यटण व्यवसायाला चालणा मिळेल . त्या दुष्टीने संबधीत खात्याने व तालुक्यातील आमदार , राजकीय , सामाजीक नेत्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे .

Google Ad

Related Articles

Back to top button
Close
Close