सरकारनामा

भाजपची गोरेगावात जाहीर सभा

भाजपची गोरेगावात जाहीर सभा

 

मुंबई , ( निसार अली ) : भारतीय जनता पार्टी  च्या वतीने नगरसेविका प्रीती सातम यांनी गोरेगाव पूर्व आरे मिल्क कॉलनी, युनिट क्र. 5, मार्केट जवळील मैदानात जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई शहरातील झाेपडपट्टी वासियांसाठी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले असून 2022 पर्यंत सर्वांना घर देण्याचा संकल्प केला आहे, या सर्वांची जनतेला माहिती देण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई भाजपचे अध्यक्ष तथा आमदार आशीष शेलार हे स्वता: विविध ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या 2011साला पर्यंतच्या झोपडपट्टीना संरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मुंबईत विविध ठिकाणी सभा घेत आहेत. यावेळी आशीष शेलार म्हणाले,
महाराष्ट्र सरकारने मुंबईतील 2011 पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण मिळण्यासंबंधीचे महत्त्वपूर्ण विधेयक मंजूर केले आहे. 2000 सालापर्यंतच्या झोपड्यांना यापूर्वीच कायद्याने संरक्षण मिळाले. गेल्या 15-16 वर्षात मुंबईत नोकरीनिमित्त आलेले हजारो लोक आजही अनधिकृत झोपड्यांमध्ये वास्तव्य करतात. त्या २०११ साला पर्यंतच्या झोपडी धारकांना घरकूल दिले जाणार असल्याचे शेलार यांनी सांगितले.

मुंबईत एसआरएच्या योजना होत नाहीत, कारण ३० टक्केच पात्र रहिवाशी अनेक ठिकाणी आहेत त्यामुळे 2011 पर्यंतच्या झोपड्यांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घर दिले जाईल. तसंच जिथे शक्य असेल तिथल्या एसआरए प्रकल्पात त्यांना घर दिलं जाण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे.

तसेच 2011 पर्यंतच्या झोपडपट्यांना संरक्षण देण्याबाबत आरे कॉलनीतील नागरिकांसह आदिवासी बांधवांना सविस्तर माहिती दिली. या सभेला मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार, आमदार-जिल्हा अध्यक्ष उत्तर पश्चिम जिल्हा अमित साटम, नगरसेविका प्रीती सातम, नगरसेवक पंकज यादव, भूपेंद्र शिरोड़कर, उपस्थित होते. या जाहिर सभेला पदाधिकारी कार्यकर्त्यांसह नागरिक हजाराेच्या संख्येने उपस्थित होते.

 

प्रीती सातम- नगरसेविका प्रभाग-52

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या 2012पर्यंतच्या झोपडपट्यांना संरक्षण या ऐतिहासिक निर्णयाबाबत आरे कॉलनीत पत्रक वाटप करण्यात आली. त्या पत्रकांच्या प्रतिसादामुळे व शंकाच निरसन करण्यासाठी आरेतील नागरिकांसाठी सभेच आयोजन करण्यात आले .

Google Ad

Related Articles

Back to top button
Close
Close