ठाणे

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील १९४२ मधिल क्रांतीवीर हुतात्मा वीर भाई कोतवाल यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील १९४२ मधिल क्रांतीवीर हुतात्मा वीर भाई कोतवाल यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

 

उल्हासनगर , ( श्याम जांबोलीकर ) : शुक्रवार दिनांक १ डिसेंबर रोजी सकाळी ठिक ११ वाजता उल्हासनगर नाभिक तरूण उत्कर्ष मंडळाच्या वतिने हुतात्मा वीर भाई कोतवाल चौक,स्टेशन रोड,व्हिनस सिनेमा जवळ उल्हासनगर -४ येथे १९४२ च्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आझाद दस्त्याचे प्रमुख इंग्रज सरकारला सळोकि पळो करूण सोडणारे भारतमातेच्या स्वातंत्र्या साठी आपल्या प्राणाची आहुती देणारे क्रांतीकारक हुतात्मा अँड.विठ्ठल लक्ष्मण कोतवाल उर्फ भाई कोतवाल यांचा १०५ वा जयंती महोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

मा.श्री राजेंद्र चौधरी नगरसेवक, शिवसेना शहर प्रमुख यांच्या शुभ हस्ते हुतात्मा वीर भाई कोतवाल यांच्या स्मारकाला पुष्प अर्पण करूण आदरांजली वाहण्यात आली माजी नगर सेवक पत्रकार मा.श्री दिलीप मालवणकर , माजी.नगरसेवक , कायद्याने वागा लोक चळवळीचे अध्यक्ष व हुतात्मा भाई कोतवाल स्मारक चौकाचे प्रणेते मा.श्री राज असरोंडकर यांनी मार्गदर्शनास्पद दोन शब्द व्यक्त केले.

सदरील कार्यक्रमात दैनिक लोकमत चे उपसंपादक श्री सदानंद नाईक, दैनिक जनतेचा महानायक चे बिरो चीफ श्री सुखनंदन गवई, परिवर्तन लोक चळवळीचे संस्थापक श्री राजकुमार सुर्वे ,काँग्रेस मागासवर्गीय सेल चे श्री किशोर धडके,भारिप युवा उल्हासनगर शहर अध्यक्ष अँड.जय गायकवाड,मनविसे उल्हासनगर उपाध्यक्ष अँड. कल्पेश माने,दैनिक मुलनिवासी नायकचे कोकण प्रतिनिधी श्री सुरेश जगताप , भाजपा युवा मोर्चाचे श्री नरेन वेडवाला,शिवाई नगर शाखा प्रमुख श्री विनोद हिंगे , उद्योगपती श्री राजेश नाईक, आदि मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी उल्हासनगर शहरातील पत्रकार बांधव मनोज रावल, सलिम मन्सुरी,अनिल भेरे, निलेश जाधव,जगनाथ निपुर्ते हे देखिल उपस्थित होते.

सदरील कार्यक्रमात उल्हासनगर शहरातील नाभिक बांधवांनी मोठ्या संखेने आपली उपस्थिती दर्शविली रामकिसन रावताळे,पाडुरंग राऊत ,मोहन क्षिरसागर या जेष्ठ नाभिक समाजबाधवांनी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रम यशस्वी होण्या साठी उल्हासनगर नाभिक तरूण उत्कर्ष मंडळाचे मनोज कोरडे,मंगेश सायखेडे,संदिप सायखेडे,अंकुश श्रीखंडे,रामेश्वर साळुंखे ,अतुल फुलपगारे,सचिन पवार ,अमोल आबुसकर यांनी अथकपरिश्रम केले.

Google Ad

Related Articles

Back to top button
Close
Close