मुंबई उपनगर

मढ येथे आमदार अस्लम शेख यांची बोट पलटली

मढ येथे आमदार अस्लम शेख यांची बोट पलटली

 

मुंबई , ( निसार अली ) : मढ समुद्र मध्ये असलेल्या   बगदादी शाह बाबा यांच्या  दर्गा तुन  दर्शन घेउन व भाविकांना भेटून परतताना मालाड पश्चिम चे आमदार अस्लम शेख यांचया बोटीला अपघात झाला मढ समुद्र किनाऱ्यावर येताना ही बोट पलटली सुदैवाने कोणती ही जीवित हानी नाही झाली.घटना शनिवार दिनांक 24 फेब्रुवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली  आमदार अस्लम शेख या बोटीत होते व त्यांच्या सोबत काँग्रेस नगरसेवक वीरेंद्र चौधरी व 14ते 15 लोक होती .क्षमते पेक्षा जास्त लोक यात चढल्याने ही दुर्घटना घडली अस बोलण्यात येत आहे. या दुर्घटनेत तीन  लोक जखमी झाले त्यात वकील विक्रम कपूर, रिझवना खान आणि  वाहतूक विभाग कांदिवली च्या  वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेहाना शेख आहेत. यांना  कांदिवलीतील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. आमदार सुखरूप आहेत .खासदार गोपाळ शेट्टी, माजी खासदार संजय निरुपम, माजी नगरसेवक सिराज शेख, नगरसेवक कमलेश यादव  आदी ऑस्कर हॉस्पिटलला जखमींची विचारपूस करण्यास गेले होते.दरम्यान तिघांची प्रकृती ठीक असल्याचं कळलं.

 

“”वकील विक्रम कपूर” : बोटीचा तोल गेल्याने बोट पलटली आमदार व बोटीतील सर्व लोक समुद्रात पडले कोळी बांधवांनी आम्हास वाचवले मात्र दोन महिलांनी मला पकडल्यामुळे मी ही पाणी पिउन बे शुद्ध झालो होतो आता ठीक आहे.

Google Ad
Back to top button
Close
Close