शैक्षणिक

मराठी माध्यमांच्या ९१ शाळेतील १ ली ते १० वी च्या  वर्गाना मिळणार डिजिटल धडे 

मराठी माध्यमांच्या ९१ शाळेतील १ ली ते १० वी च्या  वर्गाना मिळणार डिजिटल धडे

 

ठाणे , ( शरद घुडे ) :
ठाणे शहर स्मार्टसिटी कडे वाटचाल करीत असतानाच,आता  पालिकांच्या शाळांमधील  विद्यार्थ्यांना डिजिटल धडे देण्याचा निर्णय ठाणे महापालिका शिक्षण मंडळाने घेतला आहे. ठाणे पालिकेच्या पहिली ते दहावी यत्तेच्या १०४ शाळांच्या इमारतीमधून तब्बल २०० वर्ग डिजिटल करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. सदरचा प्रस्ताव पालिकेच्या येत्या सर्वसाधारण महासभेत मंजुरीसाठी येणार आहे.

पालिकेच्या मराठी शाळांमधील विद्यार्थी हि हायटेक व्हावे म्हणून ठाणे पालिकेच्या माध्यमातून तब्बल ३५० शिक्षकांना टेक सेव्हीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तर ऍप बनविण्याचे कामही प्रगतीपथावर आहे. डिजिटल शिक्षण करीत असताना ठाणे पालिकेच्या शाळांमधील पहिली ते चौथी इयत्तेच्या शाळांना ८ संच देण्यात येणार आहे. यात मराठी माध्यमांना ६ संच आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांना २ संच यांचा समावेश आहे. १ ली ते ८ वी च्या मराठी माध्यमांच्या ७५ शाळा, इंग्रजी माध्यमांच्या ५ शाळांसाठी १६० संचाची व्यवस्था आहे तर ९ वी आणि १० वीच्या मराठी माध्यम-१०, इंग्रजी माध्यम-३, उर्दू माध्यम-३ असे एकूण ३२ संच देण्यात येणार आहे. या संचात एलईडी, वेबकेमेरा , रेव्हूलेशन किट,आणि ५० विद्यार्थ्यांसाठी रिमोट कीबोर्ड, माउस आदींची सुविधा देण्यात येणार आहे. यासाठी तब्बल ७ कोटी ६० लाखाचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी महासभेत येणार आहे .

Google Ad

Related Articles

Back to top button
Close
Close