कोल्हापूर

मराठ्यांचे सर्वच छत्रपती समतेचे पालन करणारेः डॉक्टर सुभाष देसाई

मराठ्यांचे सर्वच छत्रपती समतेचे पालन करणारेः डॉक्टर सुभाष देसाई

गारगोटी , किशोर अबिटकर : छत्रपती शिवाजी महाराज ते छ शाहू महाराजांपर्यंतचे मराठ्यांचे सारेच छत्रपती समतेचे पालन करणारे होते. अठरा पगड जातींनी बनलेला मराठी संस्कृतीचा, मराठी बोलणारा समाज म्हणजे मराठा. त्यातही पलीकडे जाऊन या छत्रपतींचा आदर्श आजही बाळगला तर महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचे ऐक्य जोपासले जाईल. यासाठी प्रत्येक छत्रपतींचे जीवन कार्य तरुणांनी अभ्यासावे असे आवाहन जेष्ठ विचारवंत, पत्रकार द. सुभाष के. देसाई यांनी आपल्या व्याख्यानातून केले. श्री शाहू वाचनालयाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष माजी  प्राचार्य एस. के. देसाई होते.
 करवीर संस्थांचा इतिहास सविस्तर मांडताना डॉ. सुभाष देसाई म्हणाले कि, कोल्हापूर गादीवरील तीन छत्रपतींचे निधन कोल्हापूर बाहेर झाले .
डॉ. देसाई पुढे म्हणाले कि मराठांच्या कोणत्याच छत्रपतींनी मोगलाप्रमाणे शत्रू सैनिकांना गुलाम बनवलेले नाही. कोणत्याही ऐतिहासिक कागदपत्रात तास उल्लेख नाही. छ ताराराणी या करवीर संस्थानच्या संस्थापिका होत्या. त्यांच्या इतकेच महत्व समकालीन छ जिजाबाई दुसऱ्या याना आहे. त्यांनी राज्याचे संरक्षण केले. प्रसंगी युद्धात भागही घेतला. त्यांचे विस्मरण कोल्हापूर नगरीला झाले अशी खंत डॉ. देसाई यांनी व्यक्त केली. 
स्वागत डॉ. विजय  निंबाळकर यांनी केले. यावेळी शामराव देसाई, वसंतराव देसाई, दत्ता मोरे, एम. डी. देसाई, दि. ग. भोईटे, यासह मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन टी. बी. पाटील सर यांनी केले .

Google Ad

Related Articles

Back to top button
Close
Close