बुलढाणा

महाराष्ट्रातील पहीली जिजाऊ कन्या झाली लेफ्टनंट कर्नल

महाराष्ट्रातील पहीली जिजाऊ कन्या झाली लेफ्टनंट कर्नल

मेजर डॉ.ज्योती गुळवे मनीपुर येथे ४ऑगस्ट रोजी स्विकारला लेप्टनंट कर्नल चा  पदभार….

 

बुलडाणा (रविंद्र वाघ) : मातृतिर्थ बुलडाणा जिल्हातील जिजाऊ कन्या वर्धा येथे कार्यरत असलेली मेजर डॉ.ज्याेती मोतीराम गुळवे यांची मनीपुर येथे लेप्टनंट कर्णलपदी बढती मिळाली आहे.

 

मेजर डॉ ज्योती मोतीराम गुळवे ह्य आर्मी मेडीकल कोअर पुलगांव कँम्प वर्धा येथे कार्यरत होत्या , त्या सुरवातीला कँलींग पॉग, पच्छीम बंगाल येथे भारतीय सैन्यात भरती झाल्या होत्या त्यांनी भारतीय सैन्यातील दहा वर्षाच्या कारकिर्दीत विविध सेवा मेडल मिळवले आहेत , डॉ, ज्योती मोतीराम गुळवे यांचे संपुर्ण कुटूंब उच्च विद्या विभुषीत असुन वडील मोतीराम गुळवे हे पाटबंधारे विभागात आरेखक या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत , त्यांची मोठी मुलगी डॉ. भारती दत्ताञय निंबोने ह्या सुध्दा मेडिकल ऑफिसर आहेत , त्याची मुलगा राजेश मोतीराम गुळवे यांनी एमबीबीएस , एम, एस, पदवी घेतली आसुन पुणे येथे मेडिकल ऑफिसर म्हनुन कार्यत आहे, तर दुसरा योगेश मोतीराम गुळवे यांनी एम ए बीलीपी ची पदवी घेतली असुन पत्नी गीतांजली योगेश गुळवे ह्या सुध्दा दिल्ली येथे एक केमीकल कंपनीत इजिनियर आहेत.

 

मेजर डॉ ज्योती मोतीराम गुळवे यांचे वर्ग १२पर्यत चे शिक्षण भारत शाळा बुलडाणा येथे, एमबीबीएस चे शिक्षण कोल्हापुर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातुन घेतली आहे, महाराष्टातील पहीली जिजाऊ कन्या येवढ्या पदावर विराजमान झाली असल्यामुळे महाराष्टाचा गौरव वाढला आहे, मेजर डॉ ज्योती मोतीराम गुळवे यांचे अखिल भारतीय गुरू रविदास समता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष इंजि डि.टी.शिपणे, चर्मकार ऐक्य परिषदेचे अध्यक्ष लक्ष्मणराव,अखिल भारतीय गुरू रविदास समता परिषदेचे युवा प्रदेशाध्यक्ष पुरूषोत्तम बोर्ड , राज्य उपाध्यक्ष के.एम.वैरी,इजि, अशोकराव भोसले, डॉ, बबनराव परमेश्रर , शरद खरात , बुलडाणा जिल्हा अध्यक्ष ,प्रकाश डोंगरे जिल्हा कार्यध्यक्ष इंजि,शिवाजी जोहरे.प्रा, सुरज शिपने , भिमसींग शिंगणे, मुख्याध्यापक सुखदेव सिरसाठ, प्रा, जुगराव पठ्ठे, मेहकर येथील प्रसिध्द उदयोजक दिपक पहारे ,धनराज शिपणे,आदींसह आनेकांनी कौतुक केले आहे, तर डॉ ज्योती मोतीराम गुळवे ह्या मनीपुर येथे ४ऑगस्ट रोजी आपला लेप्टनंट कर्णल पदाचा पदभार स्वीकारला आहे ,अशी माहीती डॉ ज्योती मोतीराम गुळवे यांनी महाराष्ट तेज न्युज शी बोलताना दिली .

Google Ad
Tags
Back to top button
Close
Close