ठाणे

महिला अत्याचाराबाबत महिला आयोगाच्या अध्यक्षांचे मौन, महिला आयोग बरखास्त करा

महिला अत्याचाराबाबत महिला आयोगाच्या अध्यक्षांचे मौन,
महिला आयोग बरखास्त करा

 

 

ठाणे , ( श्याम जांबोलीकर ) :
ठाण्यात शिवसेना नगरसेवक गणेश कांबळे यांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या गृहिणी केर्लीन आणि ठाणे पोलीस दलातील पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या १० महिला पोलीस दलातील महिला प्रकरणात महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा चित्रा वाघ यांनी गुरुवारी ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन महिलांवरील अत्याचाराबाबत चौकशी केली. ठाणे पोलिसांनी या दोन्ही प्रकरणात दुर्लक्ष केल्याचा ठपकाही चित्रा वाघ यांनी ठेवला. महिला अत्याचारात राज्यात वाढ होत असताना महिला आयोगाच्या अध्यक्षा गायब,तर  राज्याचे गृहराज्यमंत्री यांनीही मौन धारण केल्याने त्यांचा खरपूस समाचार वाघ यांनी ठाण्याच्या शासकीय विश्राम गृहात घेत, राज्य महिला अयोग्य बरखास्त करा अशी मागणी केली.

ठाण्यातील भूमाफिया नगरसेवक याच्या अत्याचाराला बळी पडलेली केर्लीन आणि ठाणे पोलीस दलातील अत्याचाराला बळी पडलेल्या १० महिला पोलीस कर्मचारी याची गंभीर दखल ठाणे पोलिसांनी घेतली नाही. सरकारच्या रामराज्यात गृहिणी नाही तर पोलीस महिला कर्मचारीही असुरक्षित आहेत. राज्यात महिलांवरील अत्याचार वाढत असताना राज्याचे गृहमंत्री दीपक केसरकर आणि रणजित पाटील यांनी मौन धारण केले आहे. महिलांचा  छळ होत असताना त्याची साधी दखलही ठाणे पोलीस आणि राज्याच्या महिला आयोगाने घेतली नाही. महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत कुठे? महिला आयोगाच्या अध्यक्षा जर मुख्यमंत्र्यांचे पीआरओ शीप करणार असेल तर महिला अयोग बरखास्त करा अशी मागणी माजी राज्य महिला अध्यक्षा चित्रा  वाघ यांनी ठाण्यात केली. वाघ यानी  सेना नगरसेवक गणेश कांबळे आणि पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या छळाला बळी  पडलेल्या महिलांसाठी ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची गुरुवारी भेट घेतली. गृहिणी केर्लीन हिच्या प्रकरणात भादंवि ४९८ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे निर्देश यावेळी आयुक्त परमवीर सिंग यांनी कळवा पोलिसांना दिले.

राज्यात आणि ठाण्यात महिलांवरील वाढत्या अत्याचाराबाबत खंत व्यक्त करीत चित्रा वाघ यांनी ठाणे पोलीस, महिला आयोग आणि राज्याचे गृहराज्यमंत्री केसरकर आणि पाटील यांच्या कार्यपद्धतीवर  शिरसंधान केले. गृहिणी किंवा तरुणी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेल्यानंतर पोलीस तक्रारी घेत नाहीत. ठाण्यातील शिवसेना नगरसेवक गणेश कांबळे यांचा धंदा सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून झोपड्या विकणे आहे व याचे पुरावे केर्लीन कडे असल्याने तिचा छळ करण्यात येत होता असे केर्लीन यांचे म्हणणे आहे. कळवा  पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेल्या केर्लीन हिला कौटुंबिक भांडणे असल्याचे सांगत पोलीस तक्रार घेत नव्हते. दुसरीकडे पोलीस दलात असलेल्या महिला पोलीस कर्मचारी या देखील सुरक्षित नाहीत. नामदेव शिंदे यांच्या अत्याचाराला आणि विकृतीला १० महिला पोलीस कर्मचारी बळी  पडल्या याची साधी दखल  ठाणे पोलिसांनी आणि महिला आयोगाच्या अध्यक्षांनी घेतली नाही. या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या ठाणे पोलीस दलातील अधिकारी यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. या प्रकरणाबाबत अधिवेशनात आवाज उठविण्यात येणार आहे.  महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहाटे या गायब आहेत. तर राज्याचे गृहराज्यमंत्री केसरकर आणि पाटील हे मौनधारण करून आहेत. छळ वाढतोय, पोलीस तक्रार घेत नाहीत यामुळेच महिलांमध्ये नैराश्य निर्माण होत आहे. छळाला बळी  पडलेल्या महिलांना संरक्षण देण्याची गरज आहे. त्यांचे समुपदेशन करणे गरजेचे आहे. राज्यातील रामराज्य हे कागदावरच असल्याच्या उच्चन्यायालयाचे ताशेरे हेच वास्तव आहे. जर महिला आयोगाच्या अध्यक्षा  महिला अत्याचाराची दखल घेत नसतील, तर महिला आयोगाची गरज काय? महिला आयोग राज्यात अस्तित्वात आहे काय? हा महत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे . तेव्हा असा महिला आयोग  बरखास्त करा अशी मागणीच वाघ यांनी केली.

 

महिला आयोग अध्यक्षा कि, मुख्यमंत्र्यांचे पीआरओ 

राज्यात महिलांवर वाढते अत्याचार होत असताना  महिला आयोग  अध्यक्षा तोंडातून ब्र शब्द काढीत नाहीत. महिलांवरील अत्याचाराबाबत बोलण्याऐवजी त्या मुख्यमंत्री यांनी काय केले ?  काय करणार आहेत? याविषयी अधिक बोलतात तेव्हा विजया राहाटे महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत कि, मुख्यमंत्री यांच्या पीआरओ हा प्रश्न महत्वाचा आहे आणि त्याचे सप्ष्टीकरण होणे गरजेचे आहे. . ठाण्यात महिलांचा विनयभंग भररस्त्यात करणाऱ्या शाखाप्रमुख प्रकरणाची अवस्था आज काय आहे. त्या तक्रारदार महिलेची काय अवस्था आहे. याचा पाठपुरावा महिला आयोगाने करणे गरजेचे आहे. महिला आयोगाकडे येणाऱ्या महिला किती आहेत? त्यातच महिला पोलीस कर्मचारी यांच्या मागे रश्मी करंदीकर होत्या , पण राज्यात अशा किती करंदीकर पोलीस दलात आहेत. हे महत्वाचे आहे. महिलांना संरक्षण देणे आणि त्यांचे मनोधैर्य वाढविणे ही काळाची गरज आहे आणि ती महिला आयोगाने करणे गरजेचे असताना ,  एकीकडे महिला आयोगाच्या अध्यक्षा  तर दुसरीकडे महिला आयोगाच्या सदस्या अशी अवस्था आहे. गृहिणी केर्लीन आणि पोलीस दलातील पीडित महिला कर्मचारी या प्रकरणाचा पाठपुरावा महिला आयोगाने केला नाही तर आम्ही पाठपुरावा करू आणि पीडितांना संरक्षण देऊ अशी ठाम भूमिका महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा चित्र वाघ यांनी स्पष्ट केली.

Google Ad

Related Articles

Back to top button
Close
Close