पनवेल

“महेंद तथा अण्णा पंडित” याचे शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा…!

“महेंद तथा अण्णा पंडित” याचे शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा…!
आदिवासी सम्राट वृत्तपत्राने  कोरोना योद्धा पुरस्काराने केले सन्मानित.

 

पनवेल (प्रतिनिधी) : जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून संपूर्ण पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेले आदिवासी चळवळीचे वृत्तपत्र अशी ज्याची ख्याती आहे  ते  आदिवासी सम्राट  वृतपत्र व चॅनेलने अन्याय अत्याचार निर्मुलन समिती महाराष्ट्र राज्य या अराजकीय सामाजिक संघटनेचे प्रदेश सरचिटणीस आणि श्रमिक पत्रकार संघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मा. महेंद्र तथा अण्णा पंडित  यांनी कोरोना जागतिक साथरोग कालावधीत आपल्या जिवाची पर्वा न करता लॉकडाऊन मध्ये आदिवासी समाज बांधव, गरजू मजुर ज्यांचे हातावर पोट आहे अशा अडचणीत सापडलेल्या लोकांना जिवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यापासून ते कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय उपाय योजनांची माहिती त्यांचे पर्यंत पोहचविण्याची कामगिरी केली आहे. त्याच सोबत सदर कालावधीत समाजातील पिडीतांवर झालेल्या अन्याय अत्याचारांच्या घटनांमध्ये न्याय मिळवून देण्यासाठी पिडीतांना वेळोवेळी मदतीचा हात पुढे केला आहे. अण्णा पंडीत यांच्या या जिगरबाज कार्याची दखल घेऊन आदिवासी सम्राट या वृत्तपत्राने त्यांना  जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने  कोरोना योद्धा  पुरस्काराने सन्मानित केले आहे.या पुर्वी देखील वृत्तपत्र कौमी दर्पण आणि ठाणे-अरुणोदय या वृत्तपत्रांनेही अण्णा पंडित यांनी लॉकडाऊन कालावधीत केलेल्या कार्याची दखल घेऊन  कोरोना योद्धा  पुरस्काराने सन्मानित केलेले आहे.

 

अण्णा पंडित हे अनेक संस्था संघटनांच्या माध्यमातून जातीविरहीत समाजसेवेचे कार्य करीत आहेत. नुकत्याच झालेल्या लोकशाहीर, साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे जयंती  निमित्त महेंद्र तथा अण्णा पंडित यांना  साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे आधार प्रतिष्ठानच्या  वतीने आयोजित कार्यक्रमात दलित मित्र तथा आरपीआय प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब रोकडे, आरपीआय नेते अरुण पाठारे,अॅड.दिलीप वाळूंज, शितल साळवी व इतर मान्यवरांच्या हस्ते कोरोना महामारी  जनसेवक पुरस्कार  देऊन गौरविण्यात आले आहे.

अण्णा पंडित यांना अनेक संस्था संघटनांनी पुरस्कार देऊन गौरविल्याबद्दल त्यांचे समाजातील अनेक स्तरातुन कौतुक होत असुन त्याचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Google Ad
Tags
Back to top button
Close
Close