नाशिक

माहिती अधिकार कायद्याची धार बोथट करू नका कर्तव्यपुर्तीच्या उर्मीला कायद्याचा धाक बाळगण्याची गरज काय? – महेश झगडे

माहिती अधिकार कायद्याची धार बोथट करू नका
कर्तव्यपुर्तीच्या उर्मीला कायद्याचा धाक बाळगण्याची गरज काय? – महेश झगडे

नाशिक ( श्यामभाऊ जांबोलीकर ) : प्रामाणिक इच्छाशक्ती असेल तर कर्तव्यपुर्तीची उर्मी स्वस्थ बसू देत नाही आणि कर्तव्य पार  पाडले  की कुठल्याच कायद्याची अवाजवी भीती बाळगावी लागत नाही किंबहूना माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी करण्याची गरज भासतषनाही अशा शब्दात नाशिक विभागाचे महसूल आयूक्त महेश झगडे यांनी प्रशासनात जाणीवपूर्वक निर्माण केल्या जात असलेल्या उणिवांवर बोट ठेवले.तसेच एकच हत्यार वारंवार वापरले तर त्याची धार बोथट होते आणि शेवटी ते निरूपयोगी ठरते म्हणून माहिती आधिकाराचा वापर आवश्यक त्या ठिकाणी आणि वेळी व्हायला हवा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.महाराष्ट्र राज्य पञकार महासंघ आणि माहिती अधिकार समन्वय समितीच्या संयुक्त विद्यमाने  माहिती अधिकारासमोरील विद्यमान या विषयावर आयोजीत केलेल्या परिसंवादात ते बोलत होते.
रविवारी संपन्न झालेल्या  या परिसंवादासाठी नाशिक विभागातील नाशिक ,अहमदनगर,जळगाव,धुळे,नंदूरबार या पाच जिल्ह्यांसह मुंबई,पनवेल ,सोलापूर आदी जिल्ह्यातूनही असंख्य माहिती अधिकार कार्यकर्ते सहभागी झाले होते.या क्षेञात काम करतांना येणारे विविधांगी अनुभवांवर जवळपास अडीच तासाच्या मंथनावर विभागीय महसूल आयूक्त महेश झगडे यांनी आपल्या प्रदिर्घ सेवाकाळात आलेले विविध अनूभव सांगतांना कुठलाही कायदा केवळ निमित्त असतो.कायदा एक दिशा देतो माञ अंमल करण्याची इच्छाशक्ती नसेल तर फलनिष्पती शुन्य ठरते.याउलट कायदा नसेल तरी इच्छाशक्तीच्या जोरावर सकारात्मक निर्णय घेऊन उत्तम प्रशासन व्यवस्था निर्माण करता येते.हा स्वतःचा अनुभव आहे.माहिती अधिकार कायदा अंमलात येण्याआधी पुणे महापालिकेत आयुक्त म्हणून काम करतांना कुठल्याही अर्जाशिवाय अभ्यागतांना हवी ती माहिती मिळण्याची सोय उपलब्ध करून दिल्याचे सांगतांना अन्न व ओषध प्रशासनात चांगले काम केले,भ्रष्प सायपन तोडण्याचा प्रयत्न तर माझ्याविरूध्द माहिती अधिकाराचा वापर सुरू झाला,अशो खंत व्यक्त केली.माहिती अधिकार कायद्याला हत्यार म्हटले जाते.पण कुठलेही एक हत्यार नेहमी नेहमी वापरले तर त्यारी धार बसते.मग बोथट झालेले हत्यार निकामी होऊन अडगळीत पडते.माहिती अधिकार कायद्याची आवस्था अशी होऊ नये म्हणून योग्य वेळी योग्य ठिकाणी हा अधिकार वापरला जावा.त्याचा दुरूपयोग न करता समाजाच्या भल्यासाठी सदूपयोग व्हावा,तसेच प्रशासनानेही आपल्या हातात असलेल्या अधिकाराचा योग्य वापर केल्यास हा अधिकार वापरण्याची गरज कुणाला भासणार नाही असा सल्लाही त्यांनी दिला.

व्यवस्था बटाई ला चटावली -देवकर
आपल्या व्यवस्थेत काही बटाईची कमाई खाणारी प्रवृत्ती बळावल्याने न्यायाचे माप ना जनतेच्या पदरात पडते ना प्रशासनाच्या कुशल मंगल कर्तृत्वाचे कौतूक होते.जमीन बटाईला देणार्या प्रथेसारखी व्यवस्थेची अवस्था केविलवाणी झाली असून या परिस्थितीला आपणही तेव्हढेच जबाबदार आहोत असे आक्षेपवजा निरिक्षण दै.देशदूतचे संपादक विश्वास देवकर यांनी या परिसंवादाला संबोधित करतांना नोंदविले.सगळेच वाईट नसते.उडदामाजी काळे गोरे निवडता यायला हवे.व्यवस्था आपल्यावर अवलंबून आहे म्हणून आपली जबाबदारी वाढते ,माहिती अधिकार कार्यकर्त्यांचे संघटन निर्माण करून व्यवस्थेवर दबाव ठेवता येईल त्याचवेळी आपल्यातील नतद्रष्ट विचारांना,प्रवृत्तींना वेसन घालण्याचा प्रामाणिकपणा दाखवावा लागेल,रस्त्यावर आल्यानंतर आपल्या लोकशाहीचे सौंदर्य खर्या अर्थाने बहरते म्हणून आरटीआय कार्यकर्त्यांनीही एकाकी न लढता संघटीतपणे रस्त्यावरचा लढा उभा केला तर बिघडू पाहणारी व्यवस्था सुतासारखी सरळ होईल.आणि या संघर्षात ते सोबत राहतील असे सांगीतले.

स्वतःपासून सुरूवात ही खरी क्रांती- पो.आ.सिंगल

दुसर्याकडे बोट दाखवून उणिवा शोधण्याची मानसिकता ही खरी समाजाची मोठी उणिव आहे.आपण स्वतःला बदलण्याची तयारी दाखवली तर समाज बदलायला वेळ लागत नाही.व्यवस्थेत काम करणारे माणसच आहेत.फरक प्रवृतीत असतो.तो इकडे व्यवस्थेत आणि समाजात कमी अधिक प्रमाणात आहे.या नकारात्मक प्रवृत्तींना ठेचण्याची तयारी ठेवली तर बदल घडवून आणता येतो.असे पो.आयुक्त डाॕ.रविंद्र कुमार सिंगल यांनी माहिती अधिकार कार्यकर्त्यांना संबोधित करतांना सांगीतले.पोलिसांवर पैसे खाण्याचा आरोप सर्रास केला जातो,पण दोन्ही पक्ष या गोष्टीला जबाबदार आहे.प्रत्येक बाब पोलिसांवर ढकलून समाज आपली जबाबदारी झटकत असतो,त्यातून भ्रष्टाचार वाढतो.नाशिक शहरापुरते बोलायचे झाले तर संयुक्तिक तक्रार घेऊन आयुक्तालयात कुणीही आले तर त्याचे समाधान करण्यास कटीबध्द असल्याचे पो.आयुक्त डाॕ.रविंद्र कुमार सिंगल यांनी सांगीतले. पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील हे या परिसंवादासाठी आवर्जून उपस्थित होते.
प्रा.श्रीकांत सोनवणे,रमेश देवरूखकर, प्रा.गोवर्धन डिंकोडा,शिवराम पाटील,महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डाॕ.राहुल जैन बागमार यांनी आपले विचार मांडले. महाराष्ट्र राज्य पञकार महासंघाचे उपाध्यक्ष केतनभाई सोमैय्या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी होते. राहुल भारती यांनी सुञसंचालन केले.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी महासंघाचे महासचिव कुमार कडलग, सतिश रूपवते, नरेंद्र दिलीप सुर्यवंशी , गुलाब मणियार,महेश थोरात,भोर गुरूजी ,सोनल घोडके,नितीन काळे यांनी परिश्रम घेतले. परिसंवादात विशेष विचारप्रदर्शन करणारे जळगावचे गुलाब पाटील,धुळे येथील प्रभाकर कोष्टी,नाशिकच्या सीमा शिंपी,अॕड.अनिता जगताप यांना गौरवचिन्ह तर सर्व सहभागी अभ्यागत्यांना प्रमाणपञ देऊन सन्मानीत करण्यात आले.

Google Ad

Related Articles

Back to top button
Close
Close