नाशिक

माहिती अधिकार कायद्यासमोरील आव्हाने या विषयावर रविवारी नाशिकला विभागीय परिसंवादाचे आयोजन

माहिती अधिकार कायद्यासमोरील आव्हाने या विषयावर रविवारी नाशिकला विभागीय परिसंवादाचे आयोजन

 

नाशिक/प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्य पञकार महासंघ आणि माहिती अधिकार समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १० डिसेंबर रोजी माहिती अधिकार कायद्यासमोरील विद्यमान आव्हाने या विषयावर विभागीय परिसंवादाचे आयोजन केले आहे.
या परिसंवादाला मार्गदर्शन करण्यासाठी नाशिक विभागाचे महसूल आयूक्त महेश झगडे,पोलिस आयूक्त डाॕ.रविंद्र कुमार सिंघल,पोलिस उपायूक्त लक्ष्मीकांत पाटील ,दै.सकाळच्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे निवासी संपादक श्रीमंत माने,दै.देशदूतचे संपादक विश्वास देवकर,मुक्त विद्यापीठ वृत्तपञ विद्या व जनसंज्ञापन चे समन्वयकृ प्रा.श्रीकांत सोनवणे, अण्णा हजारे यांचे निकटचे सहकारी भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे राज्य सरचिटणीस अशोक सब्बन,माहिती अधिकार कायद्याचे अभ्यासक शशीकांत चंगेडे,माहिती अधिकार कायद्याचे अभ्यासक साहित्यिक रमेश देवरूखकर ,प्रा.गोवर्धन डिंकोडा यांच्यासह माहिती अधिकार क्षेञात काम करणार्या अभ्यासू मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.परिसंवादाचे अध्यक्षस्थान पाटबंधारे विभागाचे निवृत्त मुख्य अभियंता विजय पांढरे भुषविणार आहेत.
माहिती अधिकार अधिनियम २००५ मंजूर झाल्यानंतर या कायद्याकडून असलेल्या अपेक्षा पुर्ण होण्याऐवजी उभय पक्षांचा भ्रमनिरास झाला.प्रशासन आणि माहिती अधिकार कार्यकर्ता यांच्यात समन्वयाचा अभाव जाणवत असल्याने गैरसमजातून हा कायदा बदनाम होऊ लागला आहे.परिणामी प्रशासनालाही एका पातळीवर काम करणे अवघड झाले असून सामान्य जनतेच्या दृष्टीनेही हा कायदा निष्पळ ठरत असल्याचे वास्तव आहे.अनेकदा वस्तूस्थिती दडपण्यासाठी प्रामाणिक माहिती अधिकार कार्यकर्त्यांना हेतूपुरस्सर लक्ष्य करून खोट्या गुन्ह्यात फसविले जाते.दुसर्या बाजूला माहिती अधिकार क्षेञात प्रशासनाला ञास देण्याच्या हेतूने काही समाजकंटक या कायद्याचा दुरूपयोग करतात.परिणामी हा कायदा प्रभावहीन ठरून सामान्य जनतेच्या हितासाठी स्वच्छ प्रशासनाच्या अंमलबजावणीचा हेतू साध्य होतांना दिसत नाही.ही परिस्थिती बदलायची असेल तर प्रशासन आणि माहिती अधिकार कार्यकर्ता यांच्यात समन्वय वाढीस  लागणे काळाची गरज आहे.या हेतूने या परिसंवादाचे आयोजन केल्याची माहिती परिसंवादाचे आयोजक महाराष्ट्र पञकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डाॕ.राहूल जैन बागमार ,जनरल सेक्रेटरी कुमार कडलग माहिती अधिकार समन्वय समितीचे समन्वयक राहूल भारती,नितीन काळे यांनी  दिली.
रविवार दिनांक १० डिसेंबर रोजी पं.पलुस्कर सभागृह,इंद्रकुंड,पंचवटी येथे दु.१२वा.ते सायं.४वा.या वेळेत आयोजीत परिसंवादाला नाशिक,अहमदनगर,जळगाव,धुळे,नंदूरबार या पाचही जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Google Ad

Related Articles

Back to top button
Close
Close