शैक्षणिक

मुख्याध्यापक संघाच्या ‘लोकल ऑडीटर’पदी मिलिंद पांगिरेकर

मुख्याध्यापक संघाच्या ‘लोकल ऑडीटर’पदी मिलिंद पांगिरेकर 

गारगोटी प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या ‘लोकल ऑडीटर’पदी गारगोटी हायस्कूल व श्री.समर्थ ज्युनि.कॉलेजचे मुख्याध्यापक मिलिंद भिमराव पांगिरेकर यांची नुकतीच नियुक्ती झाली. संघाच्या पहिल्या मासिक सभेत श्री.पांगिरेकर यांची पदाधिकारी म्हणून निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मिलिंद पांगिरेकर हे श्री.आण्णाभाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव म्हणून कार्यरत असून संस्थेच्या वतीने चार अनुदानित विद्यार्थी वसतिगृहे चालविली जातात. बहुजन हिताय प्रतिष्ठानचे सचिव, ज्ञानप्रबोधिनीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सदस्य, तालुका माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन सेवक पतसंस्थेचे चेअरमन, तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव म्हणून काम केले आहे.

Google Ad

Related Articles

Back to top button
Close
Close