ठाणे

रोड अपघातात कायमचे अपंगत्व आलेल्या इंजिनियरला  १ कोटी ४ लाख ५५ हजार २६३ रुपयांची  नुकसानभरपाई 

रोड अपघातात कायमचे अपंगत्व आलेल्या इंजिनियरला  १ कोटी ४ लाख ५५ हजार २६३ रुपयांची  नुकसानभरपाई 

 

ठाणे , ( श्याम जांबोलीकर ) :
भिवंडी कडून ठाण्याकडे  निघालेल्या  सिविल इंजिनियरच्या मोटरबाईकला कंटेनरने दिलेल्या धडकेत खाली पडलेल्या इंजिनियर किरण उर्फ किररॉन एच पाटील याच्या पायावरून कंटेनर गेल्याने कायमचे अपंगत्व आले.  मोटार अपघात प्राधिकरणाचे सदस्य के. डी. वडाने यांनी अर्जदार पाटील याना नुकसान भरपाईपोटी  १ कोटी ४ लाख ५५ हजार २६३ रुपये कंटेनर मालक रोशन करिअर उत्तरप्रदेश आणि विमा न्यू इंडिया अशुरन्स कं लि . यांना  संयुक्तरित्या देण्याचे आदेश शनिवारी दिले. निकालात प्राधिकरणाकडे दावा दाखल केलेल्या तारखेपासून निकालापर्यंत ८ टक्के व्याज देण्याचेही नमूद करण्यात आले.

२ सप्टेंबर,२०१५ रोजी दोस्ती कोर्पोरेशन कंपनीत महिन्याला ३३ हजार रुपये वेतनावर काम करणारे सिविल इंजिनियर किरण उर्फ केररॉन एच पाटील (३८)  रा. कानेरी, भिवंडी हे आपल्या मोटरबाइकवरून भिवंडीवरून ठाण्याकडे निघाले होते. रस्त्यात महामार्गावरील दिवा पेट्रोलपंप जवळ मागून आलेल्या रोशन करिअर उत्तरप्रदेश या कंटेनरने दिलेल्या धडकेत पाटील खाली पडले. त्यांच्या अंगावरून कंटेनर गेल्याने त्यांचे दोन्ही पाय आणि कंबर निकामी झाली. अपघातानंतर त्यांच्यावर विविध शस्त्रक्रिया करण्यात आल्या.  यासाठी ४० लाखाचा खर्च आला होता.  मोटार अपघात प्राधिकरणाकडे दावा दाखल केल्यानंतर प्राधिकरणाने दावेदार पाटील याना प्रत्यक्षात बोलावले असता त्यांना रुग्णवाहिका आणि स्टरचेअरच्या साहाय्याने  आणण्यात आले. पाटील हे परावलंबी झाले, प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना एक सहाय्यकाची आवश्यकता असल्याचं प्रत्यक्ष प्राधिकरणाने पाहिले. तसेच त्यांच्या वैवाहिक जीवनातही  अपयश आले.  प्राधिकरणाने अपंगत्व आलेल्या पाटील यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ अजय कंबूर यांची साक्षही नोंदविली. त्यांनी पाटील यांच्या वास्तव स्थितीची कल्पना प्राधिकरणाला दिली. नुकसान भरपाईसाठी  दावेदार पाटील यांनी १ कोटी ५५ लाख ७ हजार ३२७ रुपयांचा दावा प्राधिकरणाकडे दाखल केला होता.

मोटार अपघात प्राधिकरणाचे सदस्य के डी  वडाने यांनी सर्वबाबी तपासून अर्जदार किरण पाटील यांना कंटेनर मालक  रोशन करिअर उत्तरप्रदेश आणि विमा कंपनी न्यू इंडिया अशुरन्स कंपनी लिमिटेड यांना संयुक्तरित्या १०० टक्के अपंगत्व आलेल्या इंजिनियर पाटील याना १ कोटी ४ लाख ५५ हजार २६३ रुपयांची भरपाई देण्याचा निकाल शनिवारी दिला. या भरपाईत २५ लाख १० हजार ३१२  रुपये ओपीडी,आयपीडी,मशीन अडीच खर्च आणि भविष्यातील नुकसान म्हणून ७३ लाख ५० हजार देण्याचे निकालात नमूद करण्यात आले. सोबतच रक्कमेवर २०१५ पासून निकालाच्या तारखेपर्यंत अर्जदाराला ८ टक्के व्याजही देण्याचा निकाल दिला. 

Google Ad

Related Articles

Back to top button
Close
Close