राष्ट्रीय घडामोडी

लासलगावच्या चार विद्यार्थ्यांची भारतीय सैन्यदलात निवड

लासलगावच्या चार विद्यार्थ्यांची भारतीय सैन्यदलात निवड

 

लासलगाव(वार्ताहर) समीर पठाण :
नुकताच आर्मी भरतीचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये लासलगाव येथील प्रवीण जाधव,महेश कासव,ऋषिकेश बच्छाव,सुहास कोकणे या चारही विद्यार्थ्यांची भारतीय सैन्यदलात निवड झाली आहे त्यांना सागर जमधडे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. त्यांचे भरतीनंतरचे प्रशिक्षण आर्टिलरी सेन्टर नाशिक येथे होणार आहे.

सदर विद्यार्थ्यांची निवड झाल्यामुळे प्रथमच त्यांचा सत्कार प्रसिद्ध कवी प्रकाश होळकर यांच्या हस्ते करण्यात आला.या प्रसंगी रवींद्र होळकर यांची ही उपस्थिती होती.यावेळी कवी प्रकाश होळकर यांनी विद्यार्थ्यांनी देशाची सेवा करून आई वडिलांचे नाव मोठे करावे व भविष्यातील वाटचालीस विध्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

Google Ad
Back to top button
Close
Close