कोल्हापूर

वंचित व्यक्तींचा सन्मान करून मानवाधिकार दिवस साजरा..

वंचित व्यक्तींचा सन्मान करून मानवाधिकार दिवस साजरा..

कोल्हापूर ( किशोर आबिटकर ) : सकाळी पेपर वाटप करून नंतर रांगोळीच्या छंदातून लेक वाचवा संदेश देणारे सूर्यकांत पाटील,स्वतःच्या आईचे कर्करोगाने निधन झाल्यानंतर त्याच रोगाच्या उपचारासाठी रुग्णांना मदत करणारे चंद्रकांत उर्फ बापु फडके,आजच्या धकाधकीच्या युगात लहान मुलांना सांभाळताना होत असणारी सर्वांची कसरत पण मतिमंद मुलांना २५वर्षांपासून सांभाळणाऱ्या मंजुळा सुतार,सोशल मीडियाच्या काळात पत्रव्यव्हराचा उत्कृष्ट छंद जोपासणारे आण्णासो चौगुले,सर्वधर्मसमभाव जपत शिक्षणक्षेत्राबरोबरच विधायक कामे करणारे राहुल उर्फ रेवगोंडा पाटील सर या उपेक्षित व्यक्तींच्या सन्मानाचा भावपुर्ण सोहळा आज शहराने अनुभवला निमित्त होते ६९व्या मानवाधिकार दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना कोल्हापुर जिल्हा व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ यांच्यावतीने आयोजित कृतज्ञता पुरस्कार वितरण सोहळ्याचे. काम आपले कर्तव्य माणुन स्वेच्छेने करणारे पण प्रसिद्धीपासून अलिप्त असणाऱ्या व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.समाजाने यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करावी अशीच भावना यामागे होती. श्रीमती सोनीदेवी रामविलास बाहेती सेवा केंद्र रोटरी क्लब येथे झालेल्या कार्यक्रमात सदर व्यक्तींना डी वाय एस पी विनायक नरळे,गावभाग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोहर राणमाळे व शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात सत्कारमूर्ती व पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या हस्ते दीपप्रज्वलनाणे झाली.जिल्हाध्यक्ष राजूदादा आरगे यांनी स्वागत तर शहराध्यक्ष शीतल मगदुम यांनी पुरस्कार विजेत्यांची ओळख करून दिली. प्रदेश उपाध्यक्ष अभिजित पटवा यांनी प्रास्ताविकात संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी बोलताना डी वाय एस पी विनायक नरळे यांनी मानवाधिकाराचे निर्माण पोलीस खात्यासाठी झाले आहे असे दिसत असले तरी यामुळे पोलिसांतील अपप्रवृत्ती कमी होण्यास मदत होते अशी भावना व्यक्त करत सर्वाना मानवाधिकार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या, गावभागचे पोलीस निरीक्षक यांनी सदर पुरस्कार विजेत्यांचे कौतुक करून नागरिकांनी पोलिसांशी थेट संपर्क साधल्यास अडचणी दूर केल्या जातील असे आश्वासन दिले,शहर वाहतूक निरिक्षक अरुण पवार यांनी संघटनेच्या माध्यमातून वाहतूक सुधारणेसाठी मदत होत असल्याचे सांगून सर्वाना शुभेच्छा दिल्या.पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी व्यक्त केलेल्या मनोगतात त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद व्यक्त होत होता.कार्यक्रमावेळी उपस्थित मान्यवर तसेच पत्रकार दयानंद लिपारे, मयुर चिंदे,साईनाथ जाधव यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.सदर कार्यक्रमास सुभाष जाधव सर,विलास यादव, शशिकांत रावळ,श्रीकांत चंगेडिया, राजेंद्र बोरा,बसवराज कोटगी,डॉ कुबेर मगदुम,किरण माळी,सन्मती मतिमंद विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कुंभार मॅडम व शिक्षक स्टाफ,इनाम महिला मंच व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.यावेळी हातकणंगले तालुका अध्यक्षपदी सागर पुजारी यांची निवड करण्यात आली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उमेश पाटील,अमित बियाणी,सुहास पाटील,उदयसिंह निंबाळकर,आप्पासाहेब पाटील सर ,विद्यासागर चराटे,संजय गुगळे,अरुण बांगड,अमित पटवा,अमोल ढवळे,शशिकांत आगलावे,लक्ष्मीकांत खंडेलवाल, अभिजित कांबळे यांनी परिश्रम घेतले.आभार प्रदर्शन राजु कोन्नूर यांनी तर कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचलन योगेश बंडगर यांनी केले.

Google Ad

Related Articles

Back to top button
Close
Close