शैक्षणिक

वाचन संस्कृतीला जगात पर्याय नाही : डीवायएसपी कृष्णात पिंगळे अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसच्या ‘वाचन चळवळ’ उपक्रमात प्रतिपादन

वाचन संस्कृतीला जगात पर्याय नाही : डीवायएसपी कृष्णात पिंगळे
अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसच्या ‘वाचन चळवळ’ उपक्रमात प्रतिपादन

प्रतिनिधी, कोल्हापूर :
‘समाजाला सध्या नैतिकतेची अत्यंत गरज आहे. नैतिकता ही कुठे बाजारात विकत मिळत नसून ती पुस्तकांच्या वाचनाने मिळते. त्यामुळे वाचन संस्कृती वाढवा ती रुजवा. कारण वाचन संस्कृतीला जगात कुठेच पर्याय नाही,’ असे प्रतिपादन जयसिंगपूरचे पोलीस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी केले.
संजय घोडावत इन्स्टिट्यूट फॉर अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस अयोजीत ‘वाचन चळवळ’ उपक्रमात बोलत होते. यावेळी वाचन चळवळीचे प्रचारक सुनील चव्हाण, संस्थेचे संचालक व स्पर्धा परीक्षा तज्ञ प्रा. महेश थोरवे, विद्यार्थी-प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृष्णात पिंगळे म्हणाले, “यशस्वी होण्यासाठी तुम्हाला पैशाची, श्रीमंतीची गरज नसून पुस्तकांचे सूक्ष्म वाचन, मनन व चिंतनाची गरज आहे. घोकंपट्टी करून एकवेळ तुम्ही परीक्षेत पास व्हाल, पण पुस्तकांच्या ज्ञानातून मिळालेली श्रीमंती आयुष्याची शिदोरी असते. ही श्रीमंती जगण्याचे समाजभान देते.” अत्यंत गरीब कुटुंबातून आलेल्या पिंगळे यांनी त्यांचा डीवायएसपीपर्यंतचा प्रवास पुस्तकांच्या जोरावर घडल्याचे नम्रपणे सांगितले. सुनील चव्हाण म्हणाले, “वाचनाच्या जोरावर डॉ. अब्दुल कलाम, डॉ. आंबेडकर, यशवंतराव चव्हाण अशा कित्येक सामान्य व्यक्तींनी विविध क्षेत्रात देशाचं नेतृत्व केले. त्यामुळे पुस्तके वाचा, ते दुसऱ्यांना वाचयला द्या. वाचन चळवळ देशभरात रुजवा.”
प्रा. महेश थोरवे म्हणाले, ‘व्यावसायिकतेपलीकडे जाऊन समाजाशी काही देणं लागतो या भावनेने आम्ही विविध सामजिक उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवत असतो. वाचन चळवळ हा उपक्रम त्याच प्रयत्नांचा एक भाग आहे.’ संस्थेचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या उपक्रमाचे सूत्रसंचालन मोतीराम पौळ यांनी केले तर आभार प्रशांत शिंदे यांनी मानले.

Google Ad

Related Articles

Back to top button
Close
Close