नाशिक

शेतकरी, व्यापारी व कामगार वर्गानी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. – जयदत्त होळकर

शेतकरी, व्यापारी व कामगार वर्गानी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. – जयदत्त होळकर

 

लासलगांव ( समीर पठाण) :
आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे शेतकरी, व्यापारी व कामगार बांधव धकाधकीचे जीवन जगत असुन कामातील व्यस्ततेमुळे त्यांना  आपल्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. परीणामी त्यांना अनेक आजारांना बळी पडावे लागते. त्यामुळे सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी केले ते आज लासलगांव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीरात बोलत होते.

श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमीत्त लासलगांव येथील स्वतंत्र कांदा बाजार आवार येथे सह्याद्री स्पेशालिटी हॉस्पीटल, नाशिक व कृषि उत्पन्न बाजार समिती, लासलगांव यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी बांधव, व्यापारी, कामगार वर्ग व इतर नागरीक यांच्याकरीता मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे विधीवत पुजन करण्यात आले. सदर शिबीरात नाशिकच्या सह्याद्री स्पेशालिटी हॉस्पीटलचे अस्थिरोग व सांधेरोपन तज्ञ डॉ. प्रकाश पाटील, जनरल व लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. हेमंतकुमार देवरे, हृदयरोग व मधुमेह तज्ञ डॉ. अभिषेक पिंप्राळेकर या डॉक्टरांनी विवीध व्याधीने त्रस्त असलेल्या 215 रूग्णांची बोन मिनरल डेन्सिटी (हाडांची ठिसुळता), ब्लड ऑक्सीजन तपासणी, बॉडी मास इन्डेक्स, इ. सी. जी., रॅण्डम ब्लड शुगर (मधुमेह तपासणी), ब्लड प्रेशर, फुफ्फुसाची तपासणी, न्युरो पॅथिक टेस्ट, उंची व वजन इ. आजारांची तपासणी केली.

याप्रसंगी बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर, उपसभापती संदीप (ललित) दरेकर, सदस्य सचिन ब्रम्हेचा, माजी सदस्य दत्तात्रय रायते यांचेसह व्यापारी, शेतकरी,  कामगार, बाजार समिती कर्मचारी आदी उपस्थित होते.

Google Ad

Related Articles

Back to top button
Close
Close