कल्याण

सफाई कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा

सफाई कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा

 

कल्याण ( शरद घुडे ) : सफाई कामगारांना ओला व सुका कचर्याचे वर्गीकरण करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत कारण सफाई कामगारांना सेनेटायझर , मास्क व  हेंडग्लोव्ज पण महिन्यात एकदाच दिले जाते . कोरोना महामारीच्या काळात ह्या सर्व साधन सामुग्री सफाई कामगारांना कामे करताना अपुरे पडते व अपुऱ्या सामग्री मुळे कामगारांच्या जिवाला धोका संभवतो तरी आयुक्तांनी त्वरित ह्या गंभीर बाबतीत लक्ष द्यावे व कामगारांच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा काम बंद आंदोलनाशिवाय पर्याय नाही असे निवेदन महानगर सफाई कर्मचारी संघाच्या वतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आले आहे .

 

कामगारांच्या मागण्या
१) प्रत्येक सफाई कर्मचाऱ्यांना रोज ३०० रुपये विशेष भत्ता मुंबई महानगरपालिका व नवी मुंबई महानगरपालिका यांच्यानुसार देण्यात यावा .

२) प्रत्येक सफाई कर्मचाऱ्यांना ५ लाख मेडिक्लेम पॉलिसी १ कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील ३ व्यक्तींना देण्यात यावी .

३) प्रत्येक सफाई कर्मचाऱ्यांना दर महिन्याला ७ दिवसांनी १ किंवा महिन्यात ४ सेनेटायझर बाटल्या देण्यात यावी .

४) प्रत्येक सफाई कर्मचाऱ्यांना मास्क दर दोन दिवसात एकदा देण्यात यावा व तोही चांगल्या दर्जाचे देण्यात यावे .

५) प्रत्येक सफाई कर्मचाऱ्यांना दोन दिवसांनी हेंडग्लोव्ज देण्यात यावे व तोही चांगल्या दर्जाचे देण्यात यावे .

उपरोक्त उल्लेख केलेल्या वरील मागण्यांवर मा.आयुक्तांनी कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने सहानुभूती पुर्वक विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा व मागण्या मान्य करावे अन्यथा काम बंद आंदोलन करणे भाग पडेल.
सदर निवेदन देताना महानगर सफाई कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष भारत गायकवाड , अधिवक्ता कोणार्क देसाई , महासचिव अब्बास घडीयाली , मनोज वाघमारे , उपाध्यक्ष रामचंद्र तायडे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते .

Google Ad
Tags
Back to top button
Close
Close