क्राइम

सहा वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या  २१ वर्षीय पेंटरला १० वर्षाची शिक्षा ५ हजाराचा दंड

सहा वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या  २१ वर्षीय पेंटरला १० वर्षाची शिक्षा ५ हजाराचा दंड

 

ठाणे ,( शरद घुडे ) :
शेजारच्या सहा वर्षीय चिमुरडीवर पाशवी बलात्कार केल्या प्रकरणी २१ वर्षीय पैंटरला दोषी ठरवीत ठाणे जिल्हा अतिरिक्त न्यायालयाचे न्यायाधीश संगीता खलिपे यांनी आरोपी धर्मेंद्र सकट याला दहा वर्षाची शिक्षा आणि ५ हजाराचा दंड अशी शिक्षा गुरुवारी ठोठावली.

११ सप्टेंबर,२०१६ रोजी संध्याकाळी ६ ते ७-३० वाजण्याच्या दरम्यान शेजारी राहणाऱ्या सहा वर्षीय चिमुरडीला बिस्किटाचे अमिश दाखवीत आरोपी सकटने आपल्या राहत्या घरात पाशवी बलात्कार केला. चिमुरडी घरी आल्यानंतर तिला असहाय्य वेदना होत असल्याने पीडितांच्या आईने पहिले असता तिला रक्तस्त्राव झालेला दिसला त्यानंतर घडलेल्या प्रकाराबाबत माहिती मिळाली. पीडित चिमुरडीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच पोलिसांनी आरोपी धर्मेंद्र सकट  याला अटक करीत त्याच्या विरोधात बलात्कार आणि बाल  लैंगिक अत्याचार विरोधी कायदा पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला. सदर प्रकरण अंतिम सुनावणीसाठी न्यायाधीश संगीता खलिपे यांच्या न्यायालयात आले होते. सरकारी वकील संगीत हिवराळे यांनी न्यायालयात हकीकत सांगत न्यायालया समोर आठ साक्षीदार तपासले यात पीडित चिमुरडीनेही आरोपीने धमकी दिल्याचे सांगत आरोपी धर्मेंद्र याला ओळखले. पीडित चिमुरडीची साक्ष महत्वाची ठरली. न्यायाधीश संगीता खलिपे यांनी न्यायालयातील सदर पुरावे आणि साक्ष ग्राह्य धरून १० वर्षांची शिक्षा आणि ५ हजाराचा दंड अशी शिक्षा ठोठावली.

Google Ad

Related Articles

Back to top button
Close
Close