नाशिक

सामाजिक न्यायासाठी असंघटीत क्षेत्रातील काम करणाऱ्या महिलांचे संघटन होणे गरजेचे

सामाजिक न्यायासाठी असंघटीत क्षेत्रातील काम करणाऱ्या महिलांचे संघटन होणे गरजेचे

 

लासलगाव (वार्ताहर) समीर पठाण :
सर्व वंचित घटकांना संधी मिळणे त्यासाठी शासकीय योजना तळागाळा पर्यंत पोहचणे गरजेचे आहे तरच सामाजिक न्यायापासून वंचित घटकांना शासकीय धोरणाचा निश्चितच फायदा होईल असे प्रतिपादन नवनिर्वाचित लासलगाव ग्रा.प.सदस्य निलेश लचके यांनी लासलगाव येथे दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय कामगार शिक्षण व विकास बोर्ड आणि श्रीराम शैक्षणिक विकास केंद्र आयोजित दोन दिवसीय अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाच्या महिलासाठीच्या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.

सामाजिक न्यायासाठी असंघटीत क्षेत्रातील काम करणाऱ्या महिलांचे संघटन होणे गरजेचे आहे तसेच महिलां सक्षमीकरणासाठी महिलांचा उद्योगजकीय व्यक्तिमत्वाचा विकास होणे गरजेचे आहे असे मत किशोर जाधव यांनी व्यक्त केले.

भारताची राज्यघटना जगात सर्वात श्रेष्ठ मानली जाते त्यामुळेच सामाजिक न्याय,बंधुत्व,राष्ट्रीय एकात्मता टिकून आहे ,असे प्रतिपादन डॉ.चारुदत्त अहिरे यांनी यावेळी मार्गदर्शनपर केले. महिला सक्षमीकरणासाठी शासनाच्या कल्याणकारी योजनाची सांगड घालणे गरजेचे आहे असे प्रतिपादन वरिष्ठ शिक्षण अधिकारी रमेश मडावी यांनी यावेळी मार्गदर्शनपर व्यक्त केले.यावेळी संस्थेच्या  वतीने राबविण्यात आलेल्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमाचा माहिती देण्यात आली .

या कार्यक्रमाच्या प्रथम सावित्रीबाई फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस वंदन व पुष्पहार अर्पण करून निलेश लचके  यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले याप्रसंगी प्रमुख अथिती म्हणून ,संस्थेच्या सेक्रेटरी सविता वैद्य ,अध्यक्ष किशोर जाधव,वरिष्ठ शिक्षण अधिकारी रमेश मडावी,डॉ.चारुदत्त अहिरे व लाभार्थी महिला उपस्थित होत्या . यावेळी संस्थेच्या वतीने लासलगाव ग्रा.प.च्या सदस्यपदी बिनविरोध निलेश लचके यांची निवड झाल्याने संस्थ्च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशश्वितेसाठी विजय केदारे,राहुल झेंडफळे आदींनी परिश्रम घेतले संस्थेच्या वतीने उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता झाली.

Google Ad

Related Articles

Back to top button
Close
Close