क्राइम

सौर उर्जवरील पथदिव्याच्या सौर पॅनेल व बॅटरी चोरट्यांकडून लंपास

सौर उर्जवरील पथदिव्याच्या सौर पॅनेल व बॅटरी चोरटयांकडून लंपास

कडगाव/शैलेंद्र उळेगड्डी
भुदरगड तालुक्यातील पश्चिम भागातील तांब्याचीवाडी आणि तांबाळे या गावातील सौर ऊर्जेवर चालणारे पथदिव्याचे सौर पॅनेल व बॅटरी चोरट्यांनी लंपास केल्या आहेत याबाबत ग्रामसेवकांनी भुदरगड पोलीसात तक्रार दिली आहे
ग्रामीण भागात ज्या ठिकाणी वीजेची सोय नाही अश्या ठिकाणी ग्रामपंचायत मार्फत सौर उर्जेवरील पथदिवे बसवले होते यामध्ये शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि दलीत वस्तीचा समावेश करण्यात आला होता . मात्र हे सौर पथदिवे बसवल्यानंतर काही महिन्यातच अज्ञानात चोरटयांनी सौर पॅनेल व बॅटरी चोरून नेली आहे या मध्ये तांब्याची वाडी येथील सहा पथदिवे तर तांबाळे येथील चार सौर पथदिवे चोरटयांनी चोरले आहेत.
हा भाग दूर्गम आहे रात्री जंगली जनावरा पासून संरक्षण व्हावे तसेच वाड्यावस्त्यावरिल लोकांना रात्री वीजेची सोय मिळावी म्हणून बसवण्यात आलेले पथदिवे चोरट्यांनी लंपास केल्याने नागरिकांची गैरसोय निर्माण झाली आहे . याबाबत ग्रामसेवकांनी पोलीसात तक्रार दिली आहे.अश्या चोरी मुळे रात्री-अपरात्री घरातून बाहेर पडताना अंधारातून निघावे लागल्याने तसेच काळोखाचा फायदा घेत आणखीन चोऱ्या वाढतील या भीतीने या विभागातील लोक चिंतेत आहेत.
भुरट्या चोरांचा तात्काळ बदोबस्त केल्या नाहीतर तालुक्यातील अन्य गावातील सौर पॅनेल व बॅटरी चोरी होतील असे नागरिकांतून बोलले जात आहे

फोटो – तांबाळे येथील चोरीस गेलेले सौर पॅनेल व बॅटरी

Google Ad

Related Articles

Back to top button
Close
Close