ठाणे

स्वातंत्र दिनी पत्रकारांचे बेमुदत उपोषण सुरू !!!

स्वातंत्र दिनी पत्रकारांचे बेमुदत उपोषण सुरू !!!

शहापुरच्या तहसीलदार निलीमा सुर्यवंशी यांच्या बदलीची केली मागणी

जनतेच्या समस्यांसाठी उपोषण करून पत्रकारांनी रचला नवा आदर्श

आजी माजी आमदारांसहित सामाजिक संस्थानी केला पाठिंबा जाहीर

 

शहापूर ( प्रतिनिधी ) : शहापूरच्या तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांच्या मुजोर कारभाराविरोधात तालुक्यातील सर्व पत्रकार एकवटले असून स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तहसिलदार निलिमा सुर्यवंशी – थिटे यांचा निषेध व्यक्त करीत काळ्या फिती लावुन तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात पत्रकारांनी बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे.या उपोषणात मोठ्या संख्येने पत्रकार सामील झाले असून समाजातील विविध स्तरावरील व्यक्ती, सामाजिक संस्था तसेच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी प्रत्यक्ष भेटून पाठिंबा जाहीर केला आहे . साथरोग नियंत्रण कायद्याचे पूर्णपणे पालन करून सुरू केलेल्या साखळी उपोषणाच्या पहिल्या दिवशी किरण निचिते ,लता गगे ,वसंत पानसरे आणि रमेश भेरे हे पत्रकार उपोषणाला बसले होते .जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत कायद्याचे पालन करून रोज चार पत्रकार साखळी उपोषण सुरू ठेवणार आहेत .

 

कोरोना महामारी आटोक्यात आणण्यात आलेले अपयश, पत्रकारांना देण्यात येणाऱ्या धमक्या,तालुक्याचा मंदावलेला विकास,व तालुक्यातील पत्रकार,राजकीय सामाजिक कार्यकर्ते याना सन्मानाची वागणूक न देणाऱ्या शहापुरच्या निष्क्रिय तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांच्या विरोधात शहापूर तालुक्यात रोष दिसून येतो . हा रोष पत्रकारांच्या उपोषनातुन स्पष्ट दिसून आला .या दरम्यान उपोषण का करावे लागत आहे याची माहिती जेष्ठ पत्रकार योगेश हजारे,महेश धानके यांनी दिली व हा लढा केवळ पत्रकारांचा लढा नसून जनतेचा लढा असल्याचे त्यांनी सांगितले, आज तालुक्यातील प्रशांत गडगे, रवींद्र लकडे,सुनील घरत,दिलीप वरकुटे,उमेश भेरे,उमेश जोशी,जयवंत भडंगे, हरेश साबळे,सोमनाथ शिर्के,रवींद्र सोनवळे, प्रकाश फर्डे, प्रकाश जाधव,फय्याज शेख,हुसेन शेख,रुपेश जाधव,विकी उंबरगोंडे,प्रशांत भोईर,विठ्ठल धारवणे,रमेश घावट,रवींद्र धारवणे,रवींद्र खाडे, धनेश वेखंडे,काळुराम भोईर, बाळू बोन्द्रे, प्रियेश जगे,सुनील फर्डे,कुमार भोईर,महेश तारमले, दिनेश पाचघरे,संतोष भेरे,अतु भोईर,आदी पत्रकार उपस्थित होते,आज उपोषणकर्त्यांची भेट घेऊन तालुक्याचे आमदार दौलत दरोडा,राष्ट्रवादीचे तालुका आध्यक्ष मनोज विशे, सभापती संजय निमसे,यांन सहित
क्रांन्तीकारी पत्रकार संघ, ठाणे जिल्हा, व शहापुर तालुका,धर्मविर युवा प्रतिष्ठाण, शहापुर तालुका,आखिल भारतीय सरपंच परीषद,छावा क्रांतीकारी सेना , महाराष्ट्र राज्य,आमदार दौलत दरोडा, शहापुर विधान सभा,निसर्ग पर्यावरण सामाजिक हक्क संस्था, धसई,खातीवली विकास आघाडी, शहापुर,कुणबी समाज सेवा संस्था, शहापुर,महाराष्ट्र नवनिर्मान सेना, शहापुर तालुका,रजनी संतोष शिंदे, नगराध्यक्षा, शहापुर नगर पंचायत,भारतीय मानव विकास महासंघ, महाराष्ट्र,वंचित बहुजन आघाडी, शहापुर तालुका,ओबिसी संघर्ष समीती,श्री समर्थ प्रतिष्ठाण, संभाजी बिग्रेड शहापुर, शहापुर निवासी कुणबी समाज मंडळ,इत्यादि संस्थांनी पत्रकारांच्या आंदोलनाला जाहिर पाठींबा पत्र दिले आहे.

Google Ad
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close