क्राइम

हत्याप्रकरणी जन्मठेप भोगीत असताना पेरॉलवर आला आणि फरार झाला , पेरॉलवर येऊन फरारी झालेल्या हत्याप्रकरणातील  आरोपीला १७ वर्षानंतर अटक 

हत्याप्रकरणी जन्मठेप भोगीत असताना पेरॉलवर आला आणि फरार झाला , पेरॉलवर येऊन फरारी झालेल्या हत्याप्रकरणातील  आरोपीला १७ वर्षानंतर अटक 

 

ठाणे , ( शरद घुडे ) :
हत्येच्या गुन्ह्यात न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावल्यानंतर पेरॉलवर कारागृहातून मुक्तता करीत धूम ठोकणाऱ्या आरोपी  वेदप्रकाश विरेंद्रकुमार सिंग याला ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने युपी येथून तब्बल १७ वर्षानंतर अटक केली.

वेदप्रकाश विरेंद्रकुमार सिंग याला १९९४  मालमत्तेच्या वादातून करण्यात आलेल्या हत्ये प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा १९९७ साली ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली होती. या गुन्ह्यात  वेदप्रकाश याच्या सोबत प्रयागसिंग भारती सिंग, व अशोक कुमार उपेंद्र सिंग यांचा समावेश होता. ते सर्व पुण्याच्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होते. दरम्यान २००१ साली आरोपी वेदप्रकाश विरेंद्रकुमार सिंग हा पेरॉलवर कारागृहाबाहेर आला आणि  त्याने पौबारा केला.  दरम्यान हा फरार आरोपी उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथे राहत असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना मिळाली होती. त्यानुसार ठाकरे व त्यांच्या पथकाने सुलतानपूर गाठून युपीच्या स्पेशल टास्क फोर्सच्या मदतीने वेदप्रकाश विरेंद्रकुमार सिंग (48) यास बुधवारी अटक केली. या आरोपीस पुढील तपास कामी वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविराज कुऱ्हाडे, पोलीस हवालदार आनंदा भिलारे, पोलीस हवालदार सुनील जाधव, पोलीस नाईक संभाजी मोरे, शिवाजी गायकवाड आदींच्या पथकाने केली.

Google Ad

Related Articles

Back to top button
Close
Close