धार्मिक

हिन्दू धर्मजागृती सभा के माध्यम से भिवंडी की हिन्दू जनता हिन्दू राष्ट्र की नींव डालने के लिए सिद्ध !! – श्री. प्रसाद वडके 

हिन्दू धर्मजागृती सभा के माध्यम से भिवंडी की हिन्दू जनता हिन्दू राष्ट्र की नींव डालने के लिए सिद्ध !! – श्री. प्रसाद वडके 

 

भिवंडी दि.२४ (वेंकटेश रापेल्ली) हिंदूंवर होणारे अन्याय आणि अत्याचार यांना वाचा फोडणे अन् धर्मशिक्षणाद्वारे हिंदूंना संघटित करणे, तसेच हिंदुराष्ट्र स्थापनेची पायाभरणी करणे, यांसाठी भिवंडीवासीय सिध्द झाले आहेत. येत्या २८ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता कामतघर येथील काटेकर मैदान येथे होणार्‍या हिंदु धर्मजागृती साभेला जास्तीत जास्त हिंदूंनी उपस्थित राहून आपले धर्मकर्तव्य बजावावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद वडके यांनी पत्रकार परिषदेत केले.

या सभेला प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्रीराम युवा सेनेचे अध्यक्ष आणि भाजपचे आमदार श्री. टी. राजासिंह, हिंदू जनजागृती समितेचे श्री. प्रसाद वडके, रणरागिणी शाखेच्या सौ. क्षिप्रा जुवेकर आणि हिंदु विधिज्ञ परिषदेचे अधिवक्ता विरेंद्र इचलकरंजीकर आदी मान्यवर उपस्थितांना ज्वलंत अन् तेजस्वी विचारांनी संबोधित करणार आहेत. हिंदु धर्मजागृती सभेचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून भिवंडी तालुक्यात पेक्षा २९५ अधिक बैठक घेऊन, फ्लेक्स, फलक,हस्तपत्रके, होर्डिंग  लावून तसेच रिक्षा ठिकठिकाणी फिरवून सभेला येण्याचे आवाहान करण्यात येत आहे. याचबरोबर फेसबूक,व्हॉट्सअ‍ॅप आदी सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत सभेचा विषय पोचवला जात आहे. यावेळी बोलताना सनानतन संस्थच्या सौ. दिक्षा पेंडभाजे म्हणाल्या, ‘आज देशात लव्ह जिहाद, धर्मांतर, आणि गोहत्या अशा अनेक समस्या भेडसावत आहेत, यावर शासनाने कठोर पाऊले उचलण्याची गरज आहे,सध्या राज्यात गोहत्याबंदी कायदा असतानाही गोहत्या करणार्‍यांना पकडून देणार्‍या गोरक्षकांवर कारवाई होत आहे पण कसाई मोकाट सुटत आहेत, अशा सर्व समस्या सोडवण्यासाठी तसेच त्यावर मात  करण्यासाठी हिंदु धर्मजागृती सभेत मार्गदर्शन केले जाणार आहे’.

हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रचारासाठी २५ जानेवारी रोजी वाहनफेरी

हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने भिवंडी येथे भव्य अशा वाहनफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. २५ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता वर्‍हाळ देवी मंदिर येथून या वाहनफेरीला आरंभ होणार असून ही फेरी धामणकर नाका, कल्याण नाका, अशोक नगर, एस. टी. स्टँड, वंजारपट्टी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक,अजयनगर, कोंबडपाडा या मार्गे येऊन  छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे या फेरीची सांगता करण्यात येणार आहे.

फोटो कॅप्शन : छायाचित्राच्या डावीकडून हिंदू विधिज्ञ परिषदेचे अधिवक्ता विवेक भावे, भाजप कल्याण शहर उपाध्यक्ष डॉ. उपेंद्र डहाके, हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद वडके, ह.भ.प. चिंतामणी महाराज, सनातन संस्थेच्या सौ. दीक्षा पेंडभाजे.

Google Ad

Related Articles

Back to top button
Close
Close