क्राइम

११००ग्राम गांजा नशेच्या सिरिपच्या २५० बाटल्यासह दुकलीला अटक महिलेचा समावेश  एक महिला  फरार होण्यात यशस्वी

११००ग्राम गांजा नशेच्या सिरिपच्या २५० बाटल्यासह दुकलीला अटक महिलेचा समावेश 
एक महिला  फरार होण्यात यशस्वी

 

मुंब्रा , ( श्याम जांबोलीकर ) :
मुंब्रा परिसर आणि तरुणपिढी  अंमली पदार्थाच्या आणि नशेच्या विळख्यात अडकले आहेत. अमलीपदार्थाच्या विक्रीप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी २ महिन्यात तब्बल ६३ गुन्हे दाखल करीत ७७ लोकांवर कारवाई केली असतानाही बुधवारी दुपारी अंमलीपदार्थ विक्री करणाऱ्या  आरोपी अरबाज शेख आणि झैबा नबाब शेख या दुकलीला  ११०० ग्राम गांजा आणि २५० विविध  नशेच्या सिरप बाटल्यासह अटक करण्यात आली. तर आरोपी सईदा शेख हि पळून जाण्यात यशस्वी झाले असल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पासलकर यांनी दिली. 

मुंब्रा पोलिसांना खबऱ्याच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथक बॉंम्बे कॉलोनी येथील संतोष ग्राउंड मध्ये अमलीपदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापाला रचला होता.  आरोपी  सईदा युसूफ शेख, अरबाज शेख रा. रोशनी अपार्टमेंट, ठाकूरपाडा, मुंब्रा आणि झैबा नबाब शेख सर्व रा. बॉम्बे कॉलोनी, तृप्ती अपार्टमेंट, मुंब्रा  हे संतोष ग्राउंड, मुंब्रा येथे एकत्र येत असताना पोलिसांनी त्यांना हटकले, त्यानंतर सर्व आरोपी मुद्देमालासह पळून जाऊ लागले. यात अरबाज आणि झैबा याना  अटक करण्यात  आली  तर सईदा शेख पोलिसांच्या हातावर तुऱ्या देऊन फरार झाली  पोलिसांनी दुकलीकडून  २५० नशेच्या सिरप बाटल्या आणि ११०० ग्राम गांजा हस्तगत केला. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून मुंब्रा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Google Ad

Related Articles

Back to top button
Close
Close